कारंजा येथे महि‍ला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

कारंजा येथे महि‍ला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

          वाशिम, दि. 08 (जिमाका) : आज 8 मार्च  रोजी जागतिक महिला दिनानिमीत्ताने कारंजा येथे महिला व बाल विकास सेवा योजना प्रकल्प कारंजा यांच्या संयुक्त वतीने महिला सक्षमीकरण कार्यशाळा महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

        या कार्यशाळेला जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जि.प मुख्य कार्यकारी अधि‍कारी वसुमना पंत, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा गावंडे, पंचायत समिती सभापती मनिषा रोकडे,उपसभापती किशोर ढाकुलकर,जि.प सदस्य वैशाली लळे, मीना भोने, चंद्रशेखर डोईफोडे,अशोक डोंगरदिवे,दत्तात्रय दहातोंडे,पंचायत समिती सदस्य वर्षा गवई, मोनाली तायडे, दिनेश वाडेकर, देवानंद देवळे, प्रदीप देशमुख, शुभम बोलके , विलास घोडे, गटविकास अधिकारी मोहन श्रृंगारे, ॲड.नितल रामटेके, अश्विनी अवताडे यांची प्रमुख उपस्थि‍ती होती.

        जि.प. अध्यक्ष श्री. ठाकरे यांनी महिलांच्या राजकीय,सामाजिक व प्रशासकीय सेवेबाबत प्रशंसा केली. श्रीमती पंत यांनी मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत आवाहन केले.तसेच मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले. महिलांनी महिलांना सहकार्य करुन पुढे जाण्यास मदत केली पाहीजे असे त्या म्हणाल्या.

        यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जि.प. महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, ॲड. नितल रामटेके व अश्विनी अवताडे यांचा जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

         माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत वेदीका जाधव,निहारीका वरघट, ईश्वरी काळे, तन्वी ठोंबरे, प्रियल कवळे या मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात आले.मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त असलेल्या लोणी, ब्राम्हणवाडा व वडगाव (रंगे) येथील सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.

         जागतिक दिव्यांग सप्ताह निमीत्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनींचा, प्राविण्यप्राप्त मुलींचा व खेळामध्ये राज्यस्तरावर खेळत असलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांच्या महत्वाकांक्षी व नाविण्यपूर्ण प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांना केळीची रोपे वितरीत करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी केले. संचालन जया खंडागळे यांनी केले.उपस्थि‍तांचे आभार गटविकास अधिकारी श्रीकांत माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विस्तार अधिकारी तुषार जाधव,पर्यवेक्षि‍का सुरेखा बोळे, लता चव्हाण यांनी परि‍श्रम घेतले.

 

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे