राज्य सरकारची दोन वर्षपूर्ती कारखेडा व इंझोरी येथे लोककलावंतांनी दिली विविध योजनांची माहिती
राज्य सरकारची दोन वर्षपूर्ती
कारखेडा व इंझोरी
येथे लोककलावंतांनी दिली
विविध
योजनांची माहिती
वाशिम, दि. 14 (जिमाका) : नुकतीच राज्यातील महाविकास आघाडी
सरकारला दोन वर्ष पुर्ण झाली. या सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवितांना काही
महत्वाचे निर्णय घेतले. जिल्हयात या काळात विविध विकास कामे करण्यात आली. सरकारने
घेतलेल्या निर्णयांची, उपक्रमांची व योजनांची माहिती नागरीकांना व्हावी याकरीता माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने आयोजित लोककलावंतांच्या
कलापथकाने मानोरा तालुक्यातील कारखेडा आणि इंझोरी या गावामध्ये ग्रामस्थांचे
मनोरंजन करुन माहिती दिली.
13 आणि 14 मार्च रोजी मानोरा तालुक्यातील
कारखेडा आणि इंझोरी या गावामध्ये सुर्यलक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेचे प्रमुख कलावंत
लोककवी विलास भालेराव व त्यांच्या सहकलावंतांनी कलापथकाच्या कार्यक्रमातून उपस्थित
ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली.
कारखेडा येथे आयोजित कार्यक्रमाला
सरपंच सोनाली देशमुख, उपसरपंच अनिल काजळे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद मुसळे,
ग्रामसचिव गणेश तायडे तसेच निता जाधव, चैताली परांडे, हभप गुरुवर्य बालयोगी वंदना
माहुरे यांची प्रामुख्याने उपस्थित होते. इंझोरी येथील कार्यक्रमाला सरपंच हिम्मत
राऊत, उपसरपंच शंकरराव नागोलकर, पोलीस पाटील दुर्योधन काळेकर, मुख्याध्यापक श्री.
बिरहाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कलापथकाने यावेळी उपस्थित
ग्रामस्थांना शिवभोजन योजना, स्व. बाळासाहेब बहुउद्देशिय कृषी संकूल, बालसंगोपन
योजना, मिशन वात्सल्य योजना, महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, महाआवास योजना,
जलजीवन मिशन योजना, समृध्दी महामार्ग यासह विविध योजनांची माहिती उपस्थित
ग्रामस्थांना दिली. या कार्यक्रमाला ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment