राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा 15 मार्चपर्यंत सहभाग नोंदवा

 

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

15 मार्चपर्यंत सहभाग नोंदवा

          वाशिम, दि. 07 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये विशेष शैक्षणिक संस्थांना अधिक कार्यक्षमतेने 15 मार्च 2022 पर्यंत स्पर्धेत सहभागी होण्याबाबत कळविले आहे. या स्पर्धेत सर्व शासकीय/ निमशासकीय, अधिकारी/ कर्मचारी भाग घेऊ शकतात. सर्व शाळा/ महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी यांना देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल. शाळा/ महाविद्यालयातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नेमुन दिलेल्या यादी भागामधून प्रत्येकी दोन या प्रमाणे स्पर्धेमध्ये भाग घेणे आवश्यक केले आहे. सर्व शाळा/ महाविद्यालयीन यांनी राष्ट्रीय सेवा योजना को-ऑर्डिनेटर यांची बैठक घेऊन 15 मार्च पर्यंत स्पर्धेचे नियोजन करावे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्पर्धेविषयीची माहिती बुथ पातळीवरील अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, सदस्य, नेहरु युवा केद्र, आणि राष्ट्रीय छात्र सेना यांना सुध्दा भाग घेण्याबाबत निर्देश दिलेले आहे. सर्व बुथ पातळीवरील अधिकारी यांनी स्पर्धेची जास्तीत जास्त प्रसिध्दी करुन स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांची माहिती ग्रुपवर अपलोड करावी. असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे