जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव नागरीकांच्या सेवेत
जिल्हा क्रीडा
संकुलातील
जलतरण तलाव नागरीकांच्या सेवेत
वाशिम, दि. 22 (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुलमध्ये असलेल्या जलतरण तलावाची
सुविधा कोवीड- १९ च्या निर्बंधामुळे बंद ठेवण्यात आला होता. सध्या कोविड-१९ च्या
निर्बंधामध्ये शिथीलता आल्याने जलतरण तलाव वाशिम जिल्हयातील आबालवृध्द नागरिक,
खेळाडूंकरीता २१ मार्चपासून सायंकाळी ६ वाजतापासुन सुरु करण्यात आला आहे. या जलतरण
तलावाची लांबी २५ मीटर असुन रुंदी २१ मीटर आहे. आकारमानावरुन हा सेमी ऑलंपीक साईजचा
आहे. एका बाजुला खोली ४ फुट असुन सदरची खोली समपातळी ६ मीटर बाय २१ मीटर आहे. तसेच
या जलतरण तलावामध्ये असलेल्या उताराची लांबी ११ मीटर आहे. दुसऱ्या बाजुची खोली ७
फुट असुन सदरची खोली समपातळी ही ८ मीटर बाय २१ मीटर आहे. या जलतरण तलावामध्ये लहान
मुलांसाठी बेबीपुल आहे. त्याचा आकार ९ मीटर बाय 6 मीटर आहे. खोली २
फुट आहे. जलतरण तलावामध्ये ८ लेन बसविलेले आहेत. जलतरण तलावामध्ये सदस्यांकरीता
नाव नोंदणी सुरु आहे.
जलतरण तलावाचे शुल्क निश्चित
करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहे. 18
वर्षाखालील मुलां-मुलींसाठी मासिक शुल्क 500 रुपये, त्रैमासिक शुल्क 14 रुपये,
सहामाही शुल्क 2500 रुपये, वार्षिक शुल्क 4000 रुपये आणि अतिथी शुल्क 45
मिनीटाकरीता 50 रुपये, इतर सभासद स्त्री-पुरुषांसाठी मासिक शुल्क 700 रुपये,
त्रैमासिक शुल्क 2000 रुपये, सहामाही शुल्क 3000 रुपये, वार्षिक शुल्क 4500 रुपये
आणि अतिथी शुल्क 45 मिनीटाकरीता 50 रुपये निश्चित केले आहे. सभासद शुल्क 100
रुपये, शैक्षणिक व इतर संस्था प्रतिष्ठानाकरीता प्रशिक्षण प्रतितास 3 हजार रुपये
50 खेळाडूकरीता आकारण्यात येईल. शैक्षणिक व इतर संस्था/संघटना/प्रतिष्ठाने यांच्या
स्पर्धाकरीता 4 तासाकरीता 15 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल समितीच्यावतीने
जिल्हयातील सर्व नागरीक, खेळाडु मुले/मुली यांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत
जास्त संख्येने आपली नाव नोंदणी करावी. अधिक माहितीकरीता ८५५१०२६५७९ आणि ८०८०६६६६४८
या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी तथा
जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव चंद्रकात उप्पलवार यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment