राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा 31 मार्चपर्यंत मुदतवाढ सहभाग नोंदविण्याचे आवाहन
राष्ट्रीय मतदार
जागृती स्पर्धा
31 मार्चपर्यंत
मुदतवाढ
सहभाग नोंदविण्याचे आवाहन
वाशिम, दि. 22 (जिमाका) : भारत
निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये विशेष शैक्षणिक संस्थांना अधिक
कार्यक्षमतेने 15 मार्च 2022 पर्यंत स्पर्धेत सहभागी होण्याबाबत कळविले होते. आता
या स्पर्धेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या राष्ट्रीय मतदार जागृती
स्पर्धेच्या अंतर्गत प्रश्न मंजूषा स्पर्धा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा,
पोस्टरची डिझाईन तयार करण्याची स्पर्धा, गाण्याची स्पर्धा व घोषवाक्य तयार
करण्याची स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. या स्पर्धेत सर्व
शासकीय/ निमशासकीय, अधिकारी/ कर्मचारी भाग घेऊ शकतात. सर्व शाळा/ महाविद्यालयीन विद्यार्थी
व कर्मचारी यांना देखील स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. शाळा/ महाविद्यालयातील मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नेमुन दिलेल्या यादी भागामधून प्रत्येकी दोन या प्रमाणे
स्पर्धेमध्ये भाग घेणे आवश्यक केले आहे. सर्व शाळा/ महाविद्यालयीन यांनी राष्ट्रीय
सेवा योजना को-ऑर्डिनेटर यांची बैठक घेऊन 31 मार्चपर्यंत स्पर्धेचे नियोजन करावे. जास्तीत
जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्पर्धेविषयीची माहिती बुथ पातळीवरील अधिकारी, राष्ट्रीय
सेवा योजना, सदस्य, नेहरु युवा केद्र, आणि राष्ट्रीय छात्र सेना यांना सुध्दा भाग घेण्याबाबत
निर्देश दिलेले आहे. सर्व बुथ पातळीवरील अधिकारी यांनी स्पर्धेची जास्तीत जास्त प्रसिध्दी
करुन स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांची माहिती ग्रुपवर अपलोड करावी. असे निवडणूक विभागाने
कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment