तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीसाठी 2 एप्रिलपर्यंत विशेष शिबीर



तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीसाठी

2 एप्रिलपर्यंत विशेष शिबीर

             वाशिम, दि. 29 (जिमाका) : 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या निमीत्ताने जिल्ह्यात 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हयात 2 एप्रिलपर्यंत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

               जिल्हयातील तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्ती यांनी विशेष सप्ताहात सहभागी होण्याकरीता जिल्हयातील नोंदणी न केलेल्या तृतीय पंथीयांनी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अथवा बीएलओ यांच्याकडे नांव नोंदणी करण्याकरीता आपण आपल्यास्तरावरुन उपविभाग/तहसिलस्तरावर तृतीय पं

थीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताहानिमित्त 31 मार्च 2022 रोजी शिबीराचे आयोजन करावे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, संदीप महाजन यांनी कळविले आहे.
                                                                      *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे