महिला दिनानिमित श्रद्धा फार्मसी कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात



महिला दिनानिमित

श्रद्धा फार्मसी कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात

          वाशिम, दि. 09 (जिमाका) : वाशिम जवळील कोंडाळा (झामरे) येथील श्रध्दा फार्मसी कॉलेजमध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाइन व श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालय, कोंडाळा (झामरे) यांच्या संयुक्तवतीने जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे यांनी बाल न्याय मुलांची व संरक्षण अधिनियम २०१५ या विषयावर मार्गदर्शन केले. समुपदेशक अनिता काळे यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कसा आळा घालावा या विषयावर माहिती दिली. चाइल्ड लाइन समन्वयक अश्विनी बरडे यांनी चाइल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 बद्दल माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रदीप शेळके, प्रा. देशमुख व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.     

               संचालन शितल राठी व गंगासागर शिंदे यांनी केले. श्रीकृष्ण खांबलकर व तुषार तेलगोटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य शरद चौधरी, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) लक्ष्मी काळे, महिला समुपदेशन केंद्र शहर पोलीस स्टेशन वाशिमच्या समुपदेशक अनिता काळे, चाइल्ड लाइन जिल्हा समन्वयक अश्विनी बर्डे, चाइल्ड लाइन सदस्य अविनाश चौधरी, अविनाश सोनवणे यांची उपस्थित होती. श्रद्धा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. आंधळे, श्रद्धा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल शिक्षक वृंद आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे