जिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा
वाशिम, दि. 09 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालय परीसरात सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), वाशिम येथे आजादी का अमृत महोत्सव व जागतीक महीला दिनाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. खेळकर, आरोग्य सेवाचे सहाय्यक संचालक डॉ. एस. व्ही. देशपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद जाधव, जिल्हा क्रीडा प्रशिक्षक श्री. शिर्शीकर, मेट्रन श्रीमती चव्हाण ईत्यादींचे उपस्थितीत रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन हा कार्यक्रम घेण्यात आला.
या मॅरेथॉन स्पर्धेत नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. यामध्ये सिमा राठोड (प्रथम क्रमांक), कोमल देवकर (व्दितीय क्रमांक) आणि मनीषा इंगोले (तृतीय क्रमांक) यांनी पटकविला. सर्व विजेत्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे यांनी कुष्ठरोग मुक्तीबाबत सर्व उपस्थितांना शपथ दिली. यावेळी सर्व कार्यालयीन व इतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. सरतडे यांनी केले. आभार सहाय्यक संचालक डॉ.देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment