Posts

Showing posts from December, 2017

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेविषयी सांगत आहेत अशोक मनवर...

वाशिम जिल्ह्यातील जांभरुण जहाँ. येथील अशोक ग्यानुजी मनवर यांची #कर्जमाफी विषयी प्रतिक्रिया...

उद्धव विश्वनाथ काळबांडे यांची कर्जमाफीविषयी प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कोकलगाव येथील शेतकरी उद्धव विश्वनाथ काळबांडे यांना 60 हजार 500 रुपयांची #कर्जमाफी मिळाली आहे. या योजनेविषयी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया...

वाशिम जिल्ह्यात ९५ हजार ८६३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

वाशिम, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील ९५ हजार ८६३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये ७१ हजार ९५४ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर ७ हजार ३६४ शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. १६ हजार ५४५ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी १९  हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेत ७७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन ६९ खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. जे शेतकरी पात्र होते ते अर्ज करु शकले नाहीत अशा शेतक-यांनाही  या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. शेवटच्या पात्र शेतक-याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली

Image
वाशिम , दि . ०४ : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये २६ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. यापैकी १६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तसेच उर्वरित सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित विभागांना केल्या. यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, कारंजाचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आपले सरकार पोर्टलवर प्रलंबित असलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच नागरिकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी लोकशाही दिन व आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या आपल्या विभागाशी संबंधित तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तूर पिकावरील मर सदृश्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी फवारणी, आळवणीचा सल्ला

वाशिम , दि . ०२ : जिल्ह्याच्या काही भागात मागील पंधरवड्यात तुरळक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. तसेच काही भागात दाट धुके पडल्याने तूर पिकावर आकस्मिक मर सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वाशिम कृषि संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते, अकोला येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. विनोद सोनाळकर, भाजीपाला तसेच फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. घावडे, जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयातील डॉ. इरफान हुसेन, करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ तुषार देशमुख आदींनी मंगरूळपीर तालुक्यातील हिसई, रहित व चिंचाळ परिसरात दिलेल्या क्षेत्र भेटीत तूर पिकावरील मर सदृश्य रोगामुळे काही प्रमाणत झाडे सुकल्याचे निदर्शनास आले आहे. हवामानाचा परिणाम व जमिनीतील बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे मत शास्त्रज्ञांनी यावेळी व्यक्त केले. मर सदृश्य रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांनी १९:१९:१९ या खताची एक फवारणी करावी. याचे प्रमाण साधारणतः १० लिटर पाण्याला १०० ते २०० ग्रॅम असे ठेवावे. तसेच शक्य झाल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईडची आळवणी

मौखिक आरोग्य तपासणी मोहीम, मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ

Image
·          मौखिक तपासणी, नेत्र चिकित्सा कक्षाचे उद्घाटन वाशिम ,  दि .  ०२  :   तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या कर्करोगाने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होत आहे. तंबाखू सेवन आणि त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ३० वर्षांवरील व्यक्तींची मौखिक तपासणी व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष महिमेचा तसेच मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ आज खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमात झाला. यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, वाशिमचे उपनगराध्यक्ष रुपेश वाघमारे, वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती राहुल तुपसांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक