Posts

Showing posts from October, 2021

'दिलखुलास' कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

Image
'दिलखुलास' कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत  मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एअर' या ॲपवर सोमवार, दि. १ आणि मंगळवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.             राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेले ‘मिशन कवचकुंडल’ आणि 'मिशन युवा स्वास्थ्य' हे अभियान, राज्यातील लसीकरणाची सद्यस्थिती,  न्यू नॉर्मल लाईफस्टाईल आणि लिव्ह विथ व्हायरस ही संकल्पना, नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेला शंभर टक्के लसीकरणाचा उपक्रम आदी विषयांची माहिती आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.                     0000

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे-नोव्हेंबरमध्ये लाभार्थ्यांना मिळणार धान्य *परिमाण व दर निश्चित

Image
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत  माहे-नोव्हेंबरमध्ये लाभार्थ्यांना मिळणार धान्य        *परिमाण व दर निश्चित वाशिम दि.३०(जिमाका) - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील  शिधापत्रिकाधारकांना ई- पॉसद्वारे योजनानिहाय धान्याचे वितरण करण्यात येते. नोव्हेंबर २०२१ करीता जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना,एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेकरिता धान्य परिमाण आणि धान्याचे दर याप्रमाणे लाभार्थ्यांना पुढीलप्रमाणे धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.      अंत्योदय अन्न योजना (प्रति कार्ड) -  १५ किलो गहू दोन रुपये प्रति किलो,२० किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो आणि एक किलो साखर वीस रुपये प्रति किलो. प्राधान्य योजना (प्रति लाभार्थी) - तीन किलो गहू दोन रुपये प्रति किलो, दोन किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलोप्रमाणे. एपीएल शेतकरी योजना (प्रति व्यक्ती) - चार किलो गहू दोन रुपये प्रति किलो प्रमाणे, एक किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो,प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अर्थात अंत्योदय योजना (प्रति व्यक्ती ) - तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत आणि 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा                -पालकमंत्री शंभूराज देसाई  दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा सभा  वाशिम दि.२९ (जिमाका) जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून देण्यात येणार्‍या मदतीचा निधी जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात वाटप करण्यात आला असून तो निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.        आज २९ ऑक्टोबर रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्याचा आढावा घेताना श्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेडकर जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आमरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांची प्रामुख्

नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी - न्या.आर.पी. कुलकर्णी

Image
नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी                     - न्या.आर.पी. कुलकर्णी  वाशिम,दि.२९ - (जिमाका) प्रत्येक व्यक्ती हा त्याचे अधिकार माहीत करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी. असे प्रतिपादन मुख्य न्यायदंडाधिकारी आर.पी. कुलकर्णी यांनी केले.             आज २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा कारागृह येथे आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त वतीने कारागृहातील कैद्यांसाठी आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून न्या. कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिंदे होते. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे प्रामुख्याने उपस्थित होते.           न्या. कुलकर्णी पुढे म्हणाले, प्रत्येक नागरिकाला घटनेत नमूद केलेले मूलभूत कर्तव्य माहीत असतीलच असे नाही.राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रगीत यांचा सन्मान करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. नागरिकांनी यामध्ये कसूर केल्यास त्याबाबत शिक्षेचे प्रयोजन असलेले कायदे आहेत, असे सांगितले. यावेळी त्या

जिल्हा न्यायालयात नाटिकेच्या सादरीकरणातून हुंडाबळी व स्त्रीभ्रृणहत्या विषयावर जनजागृती

Image
  जिल्हा न्यायालयात नाटिकेच्या सादरीकरणातून हुंडाबळी व स्त्रीभ्रृणहत्या विषयावर जनजागृती वाशिम ,   दि.   27   (जिमाका) :   आज 27 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालय येथे आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील एम.एस. डब्लु प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीभ्रृण हत्या, हुंडाबळी आणि कौटुंबिक छळ या विषयावर नाटकाचे सादरीकरण केले. उपस्थितांना स्त्रीभ्रृण हत्या करणे गुन्हा आहे, विवाहीत स्त्रीचा छळ करु नये तसेच मुलगी शिकली तर कुटूंब शिकेल आणि कुटूंब शिकले तर समाज सुधारेल आणि पर्यायाने राष्ट्र उभारणीच्या कार्याला मदत होईल असा प्रभावी संदेश या नाटिकेमधून भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थिताला दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. सावंत हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस.पी. शिंदे, न्या. पी.पी. देशपांडे, न्या. श्रीमती एस.व्ही. फुलबांधे, न्या. पी.एच. नेरकर, न्या. आर.पी. कुलकर्णी, इतर न्यायीक अधिकारी, डॉ. रचना तेहरा व समाजकार्य महाविद्यालया

कोणतेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये - न्या. एस.पी. शिंदे

Image
  कोणतेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये -          न्या. एस.पी. शिंदे वाशिम ,   दि.   26   (जिमाका) :   शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणतेही मुल हे शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस.पी. शिंदे यांनी केले. 26 ऑक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील वांगी येथे आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबीरात अध्यक्षस्थानावरुन न्या. श्री. शिंदे बोलत होते. यावेळी न्या. एम.एस. पदवाड, ॲड. शुभम लुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्या. शिंदे पुढे म्हणाले, आई-वडिलांनी मुलांच्या नावावर संपत्ती करुन देतांना त्यांच्या स्वत:च्या उदरनिर्वाहाची तरतुद करावी असे सांगितले. न्या. श्री. पदवाड व ॲड. श्री. लुंगे यांनी ज्येष्ठ नागरीकांचे अधिकार आणि प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वांगी येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसेविका श्रीमती. इढोळे तसेच ग्रामस्थ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी उपस्थित होते

शोषीतांना त्यांच्या हक्क व अधिकारांची जाणीव करुन देणे आपले कर्तव्य - न्या. श्रीमती सावंत

Image
  शोषीतांना त्यांच्या हक्क व अधिकारांची जाणीव करुन देणे आपले कर्तव्य -          न्या. श्रीमती सावंत वाशिम ,   दि.   26   (जिमाका) :   महिलांना, समाजातील गरजू आणि शोषीतांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करुन देणे हे आपले कर्तव्य आहे. असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. सावंत यांनी व्यक्त केले. 25 ऑक्टोबर रोजी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा न्यायालय येथे आयोजित कायदेविषयक शिबीरात अध्यक्षस्थानावरुन न्या. श्रीमती सावंत बोलत होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. संजय शिंदे, ॲड. प्रतिभा वैरागडे, ॲड. दिपाली सांबर, जिल्हा विधीज्ञ संघाच्या अध्यक्ष ॲड. छाया मवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. श्रीमती वैरागडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण व इतर महिलांविषयी कायद्याची माहिती दिली. ॲड. श्रीमती सांबर यांनी मुलांच्या शिक्षणाचा हक्क व महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण व अन्य महिलाविषयक कायद्याबाबतची माहिती दिली. ॲड. श्रीमती मवाळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक न्या. संजय शिंदे यांनी के

30 दिवसात उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करावा

  30 दिवसात उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करावा वाशिम ,   दि.   26   (जिमाका) :   वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या एकूण 6 पंचायत समित्यांच्या पोट निवडणूकांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होवून 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली. निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या 10 ऑगस्ट 2015 च्या आदेशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब तसेच निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विहीत नमुन्यात, शपथपत्रासह एकत्रित खर्चाचा तपशिल सादर करणे बंधनकारक आहे. तरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व उमेदवारांनी, पराभूत उमेदवारांनी तसेच निवडून आलेल्या सदस्यांनी विहीत मुदतीत म्हणजे 30 दिवसांच्या आत विहीत रितीने निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाचा अंतीम तपशिल आपल्या तालुक्याचे संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे. *******

वाशिम जिल्ह्यात एकही नविन कोरोना बाधित नाही

Image
कोरोना_अलर्ट (दि.२४ ऑक्टोबर २०२१)   वाशिम जिल्ह्यात एकही नविन कोरोना बाधित नाही कोरोना बाधितांची  सद्यस्थिती: एकूण पॉझिटिव्ह –४१७६६ ऍक्टिव्ह –९ डिस्चार्ज –४१११७ मृत्यू -६३९   (टीप:वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

वाशिम जिल्ह्यात एकही नविन कोरोना बाधित नाही

Image
कोरोना_अलर्ट (दि.२३ ऑक्टोबर २०२१)   वाशिम जिल्ह्यात एकही नविन कोरोना बाधित नाही कोरोना बाधितांची  सद्यस्थिती: एकूण पॉझिटिव्ह –४१७६६ ऍक्टिव्ह –९ डिस्चार्ज –४१११७ मृत्यू -६३९   (टीप:वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची असून इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

कोरोना लसीकरणातून गावे सुरक्षित करा - जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. वाशिम तालुका आढावा सभा

Image
  कोरोना लसीकरणातून गावे सुरक्षित करा                                           - जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. वाशिम तालुका आढावा सभा वाशिम ,   दि.   22   (जिमाका) :   कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी, तो पुर्णपणे गेलेला नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केंव्हा येईल हे सांगता येणार नाही. लस घेणे हाच एकमेव पर्याय कोरोनाला प्रतिबंध करण्यास पुरेसा आहे. ग्रामीण भागातील सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करुन गावे सुरक्षित करा. असे आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले. आज 22 ऑक्टोबर रोजी नियोजन भवनातील सभागृहात वाशिम तालुक्याचा लसीकरण आढावा आयोजित सभेत घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री. षन्मुगराजन पुढे म्हणाले, गावपातळीवर आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक यांनी परस्परांशी योग्य समन्वय साधून गावातील सर्व पात्र व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण करावे. सोयाबीन कापणी बहुतांश प्रमाणात झाली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते प्रकाशन

Image
  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते प्रकाशन वाशिम, दि. २२ (जिमाका) : जगातील पहिला महाकाव्यग्रंथ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते २० ऑक्टोबर रोजी त्यांच्या कक्षात करण्यात आले. यावेळी वाशिम येथील विष्णू लोंढे, विद्या सरपाते, भक्तीदास सुर्वे, हरिश्चंद्र पोफळे, दीपक ढोले व रामदास जाधव यांची उपस्थिती होती.          महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथामध्ये तीन पिढ्यातील २०२१ कवींच्या २०२१ कवितांचे संपादन नांदेड येथील प्रा. अशोककुमार दवणे यांनी केले आहे.           या महाकाव्यग्रंथामध्ये वाशिम जिल्ह्यातील ४५ कवींच्या ४५ कवितांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रा. डॉ.भाऊराव तनपुरे, महेंद्र ताजने, अनिल कांबळे, शेषराव धांडे, हरिश्चंद्र पोफळे, प्रा.सिद्धार्थ इंगोले, प्रा नंदू वानखडे, दीपक ढोले, विलास अंभोरे, डॉ. विजय काळे, विष्णू लोंढे, भीमराव शृंगारे, प्रकाश सावळे, सपना गुजर, विशाल भगत, उज्वला मोरे, जनार्दन भगत, धम्मानंद इंगोले, प्रज्ञानंद भगत, राहुल कांबळे, समाधान खिल्

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभ मिळण्यासाठी 1166 शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यत आधार प्रमाणीकरण करावे

Image
    महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभ मिळण्यासाठी 1166 शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यत आधार प्रमाणीकरण करावे                                                     वाशिम ,   दि. 21 (जिमाका) :   महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 92 हजार 271 शेतकऱ्यांना 580 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे जिल्ह्यातील 1166 शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी 15 नोव्हेंबर 2021 ची अंतीम मुदत देण्यात आली आहे. दोन लाख रुपयापर्यत कर्जमाफीसाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध बँकांनी 1 लाख 1 हजार 619 खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती, त्यापैकी 94 हजार 585 खातेदारांचे विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द झाली आहे. यातील 93 हजार 419 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले होते. त्यापैकी 92 हजार 271 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 580 कोटी 75 लक्ष रुपये जमा झाले आहे. मात्र विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द झ

खबरदार : लसीकरणासाठी प्रोत्साहन व समुपदेशन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकाविल्यास कारवाई होणार

Image
खबरदार : लसीकरणासाठी प्रोत्साहन व समुपदेशन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकाविल्यास कारवाई होणार वाशिम दि.२०(जिमाका) -जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींचे १००% कोविड लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी काही व्यक्तींचे समुपदेशन तर काही व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करताना काही पात्र व्यक्ती ह्या लसीकरण करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ करीत आहे.तर काही व्यक्ती कर्मचाऱ्यांना धमक्या देत असल्याची माहिती मिळाली आहे. लसीकरण करणार्‍या कर्मचार्‍यांना धमकावून लस न घेता त्यांच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.        जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांच्या अथक संशोधनातून कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणारे मृत्यू आटोक्यात आणण्यात यश आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरलेली लस देण्यास १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झाली.अनेकांनी या लसीचे दोन्ही डोस घेतले. काही पात्र व्य

22 ऑक्टोबरपासून जिल्हयातील चित्रपटगृहे सुरु होणार मार्गदर्शक सुचना जारी

  22 ऑक्टोबरपासून जिल्हयातील चित्रपटगृहे सुरु होणार मार्गदर्शक सुचना जारी वाशिम, दि. 20 (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने साथरोग कायदा- 1897 मधील तरतूदीची अंमलबजावणी 13 मार्च 2020 पासून लागू केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत केले आहे. कोविड विषाणूचे डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळून आले आहे. त्याचा संसर्ग झपाटयाने होत असल्याने त्यास प्रतिबंध करण्याबाबत सुचना निर्गमित करण्यात आल्या आहे. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृहे पुन्हा नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास मान्यता देऊन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षन्मुगराजन एस. यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून नियंत्रित स्वरुपात कोविड-19 बाबतच्या सर्व नियमांचे पालन करुन   सुरु करण्यास सुधारीत आदेश पारित केले आहे. वाशिम जिल्हयातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु राहतील. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी चित्रपटांच्या प्रदर्शनादरम

ब्रेक द चेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे/मोकळ्या जागेतील सांस्कृतीक कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सुचना जारी

  ब्रेक द चेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे/मोकळ्या जागेतील सांस्कृतीक कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सुचना जारी वाशिम ,   दि. 20 (जिमाका) :   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग कायद्यामधील तरतूदीची अंमलबजावणी 13 मार्च 2020 पासून लागू केली आहे. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे/ मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियंत्रित स्वरुपात सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षन्मुगराजन एस. यांचे हे सुधारीत आदेश 22 ऑक्टोबरपासून संपूर्ण वाशिम जिल्हयात लागू राहतील. बंदिस्त सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारिरीक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश दयावा, ही सभागृह व्यवस्थापनाची/आयोजकांची जबाबदारी राहील. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये, बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे आवश्य

पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी रॅन्डम सर्वेक्षणासाठी कृषी सहायकांना सहकार्य करावे

Image
  पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी रॅन्डम सर्वेक्षणासाठी कृषी सहायकांना सहकार्य करावे वाशिम, दि. 20 (जिमाका) : जिल्हयात 26 व 27 सप्टेंबर आणि 2 व 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पीकाचे नुकसान झाले आहे. 25 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचे 25 ते 30 टक्के रॅन्‍डम पध्दतीने सर्वेक्षण करण्याच्या सुचना आहे. त्यामुळे गावस्तरावर पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम चालु असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जावून सर्वेक्षण करुन पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. तालुका कृषी अधिकारी व तालुका विमा प्रतिनिधी हे रॅन्डम पध्दतीने गावे व शेतकऱ्यांची नावे निश्चित करुन पंचनाम्याची कामे करीत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा मी पीक विम्याबाबत नुकसानीची पुर्वसुचना देऊनही पंचनामा झालेला नाही, असा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी कृषी सहायकांच्या संपर्कात राहून रॅन्डम सर्वेक्षणासाठी त्यांना सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी केले आहे. ‍जिल्हयात सोयाबीन पीकाचा 1 लाख 40 हजार

पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करापालकमंत्री देसाई यांचे निर्देश

पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री देसाई यांचे निर्देश  वाशिम दि.१८ (जिमाका) -जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीने सोयाबीन,तूर व अन्य पिकांचे नुकसान झाले.जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी,यासाठी प्रशासनाने शेतीच्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.          आज १८ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री श्री देसाई यांनी जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेतली.       श्री. देसाई म्हणाले की,सोयाबीन कापणीच्या स्थितीत असतांना या पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला.यासोबतच अन्य पिकांचे देखील नुकसान झाले.जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात ६५ मिली. मीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले.शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून आपण सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून नुकसानीची माहिती वेळोवेळी घेत असल्याचे पालकमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

ईद-ए-मिलाद साजरा करण्याबाबत आदेश जारी

ईद-ए-मिलाद साजरा करण्याबाबत आदेश जारी वाशिम,दि.१७(जिमाका) -कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. १४ मार्च २०२० पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम लागू करण्यात आला आहे. १९ किंवा २० ऑक्टोबर २०२१ रोजी ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येणार आहे. कोविड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात ईद-ए-मिलाद साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी आदेश जारी केले आहे.        ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध आहे. त्यामुळे ईद-ए-मिलाद शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. मिरवणुका काढावयाच्या असल्यास पोलिस प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त पाच व्यक्तीस परवानगी देण्यात येईल. मिरवणुकीदरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. मिरवणुका सक्षम

#आजच्या महत्त्वाच्या_बातम्या पाहा,दि.१६.१०.२०२१

प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन, दीक्षाभूमीवर स्वयंसुरक्षेसाठी कोविड नियमांचे पालन करा, पाईपलाईनद्वारे घरोघरी गॅस... यासह इतर #महत्त्वाच्या_बातम्या पाहा. #TodaysNews #GovtOfMaharashtra https://t.co/rEjENcAnRt

लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

Image
लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा        -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.  #मालेगाव येथे लसीकरण आढावा सभा  वाशिम दि.१५(जिमाका) कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाही.कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे तालुक्यातील पात्र व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केले.         14 ऑक्टोबर रोजी मालेगाव तहसील कार्यालय येथे कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा घेताना आयोजित सभेत श्री षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती शोभा गोंडाळ,पंचायत समिती उपसभापती श्रीमती घोडे,तहसीलदार रवी काळे, गटविकास अधिकारी श्री खिल्लारे, तालुका आरोग्य अधिकारी बोरसे व नगर परिषदेचे मुख्यधिकारी डॉ.खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.          श्री.षण्मुगराजन पुढे म्हणाले, मालेगाव तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. जास्तीत जास्त तालुक्यातील पात्र व

जिल्हाधिकाऱ्यांकडून अवैध बायोडिझेल विक्रीबाबतचा आढावा

Image
                                                                      जिल्हाधिकाऱ्यांकडून अवैध बायोडिझेल विक्रीबाबतचा आढावा   वाशिम ,   दि.   13   (जिमाका) :   जिल्हयात काही ठिकाणी अवैध बायोडिझेल विक्री केंद्र सुरु आहे. या अवैध बायोडिझेल विक्रीबाबतचा आढावा जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 12 ऑक्टोबर रोजी घेतला. श्री. षन्मुगराजन यावेळी म्हणाले, जिल्हयात काही ठिकाणी अवैध बायोडिझेल विक्री करण्यात येत आहे. बायोडिझेलचा वापर केवळ औद्योगिक क्षेत्रासाठी असतांना जिल्हयात सुरु असलेल्या केंद्रातून वाहनांसाठी इंधन म्हणून बायोडिझेलच्या विक्रीस प्रतिबंध करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी यावेळी उपस्थित सर्व तहसिलदारांना दिले. सभेला जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वजीरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद, तहसिलदार सर्वश्री विजय साळवे, नीरज मांजरे, आशिष शेलार, रवि काळे, श्रीमती शारदा जाधव व श्री. कोंडागुरले, वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक के.एस. हनवते, पुरवठा विभागाचे व्हि.एन. राठोड, श

गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

Image
गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा        -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.  वाशिम दि.१२(जिमाका) सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर आज गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी काही जण करीत असल्याचे दिसून येते. मुलींचा जन्मदर वाढविणे ही काळाची गरज आहे.जिल्ह्यातील कोणत्याही सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंगनिदान चाचणी होणार नाही, यासाठी सर्व सोनोग्राफी सेंटरने दक्षता घेऊन गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.         आज 12 ऑक्‍टोबर रोजी नियोजन भवनातील सभागृहात पी.सी.पी.एन.डी.टी आणि एम.टी.पी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमांतर्गत आयोजित सभेत श्री षण्मुगराजन बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.          जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. किती महिला सोनोग्राफी करण्यासाठी येतात याची नोंद सोनोग्राफी सेंटरमध्य

स्वस्त धान्याचा लाभार्थ्यांना वेळेत व व्यवस्थीत पुरवठा व्हावा -जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. जिल्हा दक्षता समितीची सभा

Image
  स्वस्त धान्याचा लाभार्थ्यांना वेळेत व व्यवस्थीत पुरवठा व्हावा -जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. जिल्हा दक्षता समितीची सभा   वाशिम ,   दि.   12   (जिमाका) :   सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हयात विविध घटकातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात येतो. हे धान्य संबंधित लाभार्थ्यांना वेळेत व व्यवस्थीत मिळाले पाहिजे. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले. आज 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा दक्षता समितीची सभा वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला आ. राजेंद्र पाटणी, जिल्हा पुरवठा अधिकारी संदिप महाजन, जिल्हा उपनिबंधक श्री. मैत्रवार, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. षन्मुगराजन म्हणाले, रेशनकार्ड मागणीसाठी आलेल्या अर्जांचे स्वतंत्र रजिस्टर प्रत्येक तहसिल कार्यालयात ठेवण्यात यावे. त्या अर्जामध्ये त्रृटी असेल तर तात्काळ संबंधिताला कळवून त्रृटींची पुर्तता एका महिन्याच्या आत करुन घेवून नविन रेशनकार्ड लाभार्थ्याला उपलब्ध करुन दयावे. पुरव