महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभ मिळण्यासाठी 1166 शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यत आधार प्रमाणीकरण करावे
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
लाभ मिळण्यासाठी 1166 शेतकऱ्यांनी 15
नोव्हेंबरपर्यत
आधार प्रमाणीकरण करावे
वाशिम, दि. 21 (जिमाका) : महात्मा
ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 92 हजार 271 शेतकऱ्यांना 580
कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे
जिल्ह्यातील 1166 शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. लाभापासून वंचित
असलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी 15 नोव्हेंबर 2021 ची अंतीम मुदत
देण्यात आली आहे.
दोन लाख रुपयापर्यत कर्जमाफीसाठी महात्मा ज्योतीराव फुले
शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध बँकांनी 1 लाख 1
हजार 619 खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती, त्यापैकी 94 हजार 585
खातेदारांचे विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द झाली आहे. यातील 93 हजार 419
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले होते. त्यापैकी 92 हजार 271 शेतकऱ्यांच्या बँक
खात्यावर 580 कोटी 75 लक्ष रुपये जमा झाले आहे. मात्र विशिष्ट क्रमांकासह यादी
प्रसिध्द झाल्यानंतरही आधार प्रमाणीकरण न केलेल्या 1166 शेतकऱ्यांना अद्यापही
कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.
15 नोव्हेंबरपर्यत जिल्ह्यातील सर्व बँकांना 1166
खातेदारांशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घेण्याबाबत निर्देश दिले आहे. या
काळात संबंधित शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केले तर संबंधित खातेदारांच्या कर्जमुक्तीचा
मार्ग मोकळा होणार आहे. अन्यथा त्यानंतर या शेतकरी खातेदारांना कर्जमुक्तीचा लाभ
मिळू शकणार नाही. त्यामुळे 1166 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित बँकेत,
आपले सेवा केंद्रात जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.
काही अडचणी असल्यास संबंधित बँकेचे नोडल अधिकारी, जिल्हा
अग्रणी बँक, तालुक्यातील सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम
यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रवि गडेकर यांनी केले
आहे.
*******
Comments
Post a Comment