शोषीतांना त्यांच्या हक्क व अधिकारांची जाणीव करुन देणे आपले कर्तव्य - न्या. श्रीमती सावंत
शोषीतांना त्यांच्या हक्क व अधिकारांची
जाणीव करुन देणे आपले कर्तव्य
-
न्या. श्रीमती सावंत
वाशिम, दि. 26 (जिमाका) : महिलांना, समाजातील गरजू आणि
शोषीतांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करुन देणे हे आपले कर्तव्य आहे.
असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. सावंत यांनी व्यक्त केले.
25 ऑक्टोबर रोजी
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा न्यायालय येथे आयोजित
कायदेविषयक शिबीरात अध्यक्षस्थानावरुन न्या. श्रीमती सावंत बोलत होत्या. यावेळी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. संजय शिंदे, ॲड. प्रतिभा वैरागडे, ॲड.
दिपाली सांबर, जिल्हा विधीज्ञ संघाच्या अध्यक्ष ॲड. छाया मवाळ यांची प्रमुख
उपस्थिती होती.
ॲड. श्रीमती
वैरागडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण व इतर महिलांविषयी
कायद्याची माहिती दिली. ॲड. श्रीमती सांबर यांनी मुलांच्या शिक्षणाचा हक्क व
महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण व अन्य महिलाविषयक कायद्याबाबतची माहिती
दिली. ॲड. श्रीमती मवाळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक न्या.
संजय शिंदे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड. माधुरी वायचाळ यांनी मानले.
कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका आणि वेगवेगळया क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित
होत्या.
*******
Comments
Post a Comment