मार्च ते मे 2021 गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिक नुकसानीसाठी 6 कोटी 77 लक्ष रु. मदत जाहिर
मार्च ते मे 2021 गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिक नुकसानीसाठी 6 कोटी 77 लक्ष रु. मदत जाहिर
वाशिम, दि. 11 (जिमाका) : जिल्हयात मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले. नुकसानगृस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने गारपीट, अवकाळी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 6 कोटी 77 लक्ष 42 हजार रुपये निधी शासनाने जिल्हयासाठी मंजूर केला आहे.
नुकसानगृस्त शेतकऱ्यांना मदतची वाटप करतांना प्रचलित नियमानुसार शेती/ बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरीता मदत ही 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पुर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात मदतीची ही रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीबाबत मदतीची रक्कम संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करतांना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली सहकार विभागाच्या आदेशाशिवाय करता येणार नाही. मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तसेच जुलै 2021 महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 1 कोटी 53 लक्ष रुपये निधी देखील मंजूर झाला आहे. नैसर्गीक आपत्तीने बाधित जिल्हयातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.
Comments
Post a Comment