कृषी सचिव एकनाथ डवले यांची रिसोड येथे एस.पी.ऍग्रो इंडस्ट्रीजला भेट

कृषी सचिव एकनाथ डवले यांची        
रिसोड येथे एस.पी.ऍग्रो इंडस्ट्रीजला भेट

वाशिम दि.९ (जिमाका) राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी ८ ऑक्टोबर रोजी रिसोड येथील एस पी ऍग्रो इंडस्ट्रीजला भेट देऊन शेतीपयोगी विविध सयंत्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार आशिष शेलार,तंत्र अधिकारी श्री.कंकाळ, तालुका कृषी अधिकारी श्री उलेमाले आणि एस.पी. इंडस्ट्रीजचे संचालक एस. ए. पठाण,ए.ए.पठाण आणि इंजिनिअर सोहेल पठाण प्रामुख्याने उपस्थित होते.
      श्री. डवले यांनी एस.पी.इंडस्ट्रीज मधील बीबीएफ पेरणी यंत्र, हळदीचे पेरणी यंत्र,हळदीचे बॉयलर, पॉलिशर हळद काढणी यंत्र व अन्य शेतीपयोगी यंत्राची पहाणी केली.हे सर्व यंत्र कशाप्रकारे काम करतात याबाबतची माहिती जाणून घेतली व त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन श्री पठाण यांनी केले.
      शेतकऱ्यांना यांत्रिकी पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने शेती करता यावी तसेच काळानुरूप कृषी क्षेत्रातील होणारा बदल लक्षात घेता श्री पठाण हे मागील वीस वर्षापासून पीक पेरणी,नांगरणी व काढणीचे विविध संयंत्र तयार करीत आहे. 
        यावेळी श्री. पठाण यांनी सांगितले की सर्व यंत्रांची चाचणी करण्यात येईल. जर यंत्रांची किंमत एक लाख रुपये असेल तर शेतकऱ्यांना ते यंत्र 50 हजार रुपये अनुदानात कसे देता येईल यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी अपेक्षा श्री.पठाण यांनी कृषी सचिव श्री. डवले यांच्याकडे व्यक्त केली. येणार्‍या काही महिन्यात यासाठी प्रयत्न करण्यात येईल.असे कृषी सचिव श्री.डवले यांनी यावेळी सांगितले.
***

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश