कृषी सचिव एकनाथ डवले यांचीश्री बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनीला भेट
कृषी सचिव एकनाथ डवले यांची
श्री बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनीला भेट
वाशिम दि ०९(जिमाका) कृषी सचिव एकनाथ डवले यांनी ८ऑक्टोबर रोजी रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील श्री बाळनाथ फार्मर प्रोड्यूसर कंपनीला भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सिताफळ महासंघ पुणेचे सचिव अनिल बोंडे, तहसीलदार आशिष शेलार, तंत्र अधिकारी श्री कंकाळ, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत उलमाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाळखेड येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. यंत्राच्या सहाय्याने सिताफळापासून गर वेगळा काढण्यात येतो, त्या मशीनची व प्रतवारी यंत्राची,३०क्विंटल क्षमतेच्या कोल्ड स्टोरेजची तसेच गोदामाची पाहणी करून विक्रीसाठी तयार असलेल्या सीताफळाची कशाप्रकारे प्रतवारी करण्यात येते, याबाबतची माहिती श्री.डवले यांनी जाणून घेतली.
बाळखेड्यातील सीताफळ उत्पादक संघाचे अध्यक्ष श्री विलास गायकवाड यांनी सीताफळ प्रक्रिया उद्योगाबाबतची माहिती दिली. बाळखेड शिवारात व आजूबाजूला जवळपास दीडशे ते दोनशे एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सिताफळाची लागवड केली असून भविष्यात मोठ्या प्रमाणात सीताफळावर प्रक्रिया करावयाची असल्यामुळे सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू केल्याचे सांगितले.आईसस्क्रीममध्ये सीताफळाच्या गराचा वापर होत असल्यामुळे नागपूर येथील दिनशॉ आईस्क्रीम कंपनीच्या प्रतिनिधींनी आमच्या प्रकल्पाला भेट दिल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष मदन ढोले,सचिव तथा उपसरपंच दिनकर पऱ्हाड, संचालक बाळकिशोर गोसावी व भागवत पऱ्हाड,शेतकरी उद्धव गायकवाड, सचिन वऱ्हाड,शिवाजी सोनूने, मंडळ कृषी अधिकारी संजय थोरात, कृषी पर्यवेक्षक रमेश जाधव, कृषी सहाय्यक सचिन भोसले, मदन शिंदे,संदीप चव्हाण व कचकलवार उपस्थित होते.
Comments
Post a Comment