· जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वाशिम , दि . ०५ : मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन मराठी साहित्याला समृद्ध करण्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान देणारे असल्याचे प्रतिपादन प्रा. लता जावळे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळ यांच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने ५ जानेवारी रोजी आयोजित ‘ मराठी साहित्यामध्ये महिला साहित्यिकांचे योगदान ’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश पी. एच. नेरकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. शाम शेवलकर, ॲड. गणेशप्रसाद अवस्थी यांची उपस्थिती होती. प्रा. जावळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिल्यानंतर अनेक महिलांनी साहित्य निर्मितीत योगदान देण्यास सुरुवात केली. अगोदर केवळ बोली स्वरुपात असलेली लोकगीते, गाणी शब्द रुपात आली. साहित्याच्या माध्यमातून महिलांवर होणारा अन्याय, त्यांच...
· आता जिल्हास्तरावर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र वाशिम , दि . २१ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरु झाले. समिती कार्यालयाचे उदघाटन समितीचे अध्यक्ष आय. एम. तिटकारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त तथा समितीचे सदस्य बी. डी. खंडाते, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा समितीच्या सदस्य सचिव माया केदार, विशेष निरीक्षक श्री. मुसळे आदी उपस्थित होते. श्री. तिटकारे यांच्या हस्ते फीत कापून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन झाले. याप्रसंगी श्री. तिटकारे म्हणाले, लोकांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आजपासून वाशिम जिल्ह्यात ही समिती कार्यान्वयित झाली असून समितीचे दैनदिन कामकाज आता वाशिममध्य...
· जनजागृती फेरीतून विद्युत सुरक्षेचा संदेश वाशिम , दि. १८ : उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत ११ ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या कालवधीत विद्युत निरीक्षण विभागाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन करून तसेच शाळा, महाविद्यालये येथे कार्यक्रमांचे आयोजन करून विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती केली. या सप्ताहाच्या समारोपानिमित्त १७ जानेवारी रोजी जनजागृती फेरीचे आयोजन करून याद्वारे वीज सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली. जनजागृती फेरीमध्ये वाशिम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, वाशिम जिल्ह्यातील विद्युत कंत्राटदार व त्यांचे कामगार तसेच विद्युत निरीक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया व विद्युत निरीक्षक सारंग नाईक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती फेरीची सुरुवात केली. विद्युत निरीक्षक कार्यालयापासून बस स्थानक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका येथून सुरक्षा संदेश देत प...
Comments
Post a Comment