महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते प्रकाशन

 


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते प्रकाशन

वाशिम, दि. २२ (जिमाका) : जगातील पहिला महाकाव्यग्रंथ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते २० ऑक्टोबर रोजी त्यांच्या कक्षात करण्यात आले. यावेळी वाशिम येथील विष्णू लोंढे, विद्या सरपाते, भक्तीदास सुर्वे, हरिश्चंद्र पोफळे, दीपक ढोले व रामदास जाधव यांची उपस्थिती होती.

         महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथामध्ये तीन पिढ्यातील २०२१ कवींच्या २०२१ कवितांचे संपादन नांदेड येथील प्रा. अशोककुमार दवणे यांनी केले आहे.

          या महाकाव्यग्रंथामध्ये वाशिम जिल्ह्यातील ४५ कवींच्या ४५ कवितांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रा. डॉ.भाऊराव तनपुरे, महेंद्र ताजने, अनिल कांबळे, शेषराव धांडे, हरिश्चंद्र पोफळे, प्रा.सिद्धार्थ इंगोले, प्रा नंदू वानखडे, दीपक ढोले, विलास अंभोरे, डॉ. विजय काळे, विष्णू लोंढे, भीमराव शृंगारे, प्रकाश सावळे, सपना गुजर, विशाल भगत, उज्वला मोरे, जनार्दन भगत, धम्मानंद इंगोले, प्रज्ञानंद भगत, राहुल कांबळे, समाधान खिल्लारे, कविनंद गायकवाड, राजू सोनोने, संदीप कांबळे, दादाराव अवचार, दत्ता शेळके, भक्तीदास सुर्वे, मधुराणी बनसोड, विमल वाघमारे, स्वाती इंगळे, चाफेश्वर गांगवे, पां.उ. जाधव, अरविंद उचित, हंसिनी उचित, कनिष्क पडघान, जावेद धनू भवानीवाले, ग.ना. कांबळे, प्रा. दिलीप वानखडे, युवराज टोपले, सुरेश शृंगारे, विद्या सरपाते, डॉ. विकल पंडित, टी.जी. गायकवाड मनोहर दुपारे आणि यशवंत गुडधे या कवींचा समावेश आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश