'दिलखुलास' कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

'दिलखुलास' कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

 मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एअर' या ॲपवर सोमवार, दि. १ आणि मंगळवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेले ‘मिशन कवचकुंडल’ आणि 'मिशन युवा स्वास्थ्य' हे अभियान, राज्यातील लसीकरणाची सद्यस्थिती,  न्यू नॉर्मल लाईफस्टाईल आणि लिव्ह विथ व्हायरस ही संकल्पना, नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेला शंभर टक्के लसीकरणाचा उपक्रम आदी विषयांची माहिती आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.
                    0000

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर