· ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन · अभंग, भारूडातून वृक्षारोपणाविषयी जनजागृती वाशिम , दि . २९ : राज्य शासनामार्फत ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाविषयी जनजगृती करून त्यांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून वृक्ष दिंडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासा...
Comments
Post a Comment