पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करापालकमंत्री देसाई यांचे निर्देश

पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
पालकमंत्री देसाई यांचे निर्देश 

वाशिम दि.१८ (जिमाका) -जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीने सोयाबीन,तूर व अन्य पिकांचे नुकसान झाले.जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी,यासाठी प्रशासनाने शेतीच्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 
        आज १८ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री श्री देसाई यांनी जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेतली. 
     श्री. देसाई म्हणाले की,सोयाबीन कापणीच्या स्थितीत असतांना या पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला.यासोबतच अन्य पिकांचे देखील नुकसान झाले.जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात ६५ मिली. मीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले.शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून आपण सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून नुकसानीची माहिती वेळोवेळी घेत असल्याचे पालकमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश