30 दिवसात उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करावा

 

30 दिवसात उमेदवारांनी

खर्चाचा हिशोब सादर करावा

वाशिम, दि. 26 (जिमाका) :  वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या एकूण 6 पंचायत समित्यांच्या पोट निवडणूकांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होवून 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली. निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या 10 ऑगस्ट 2015 च्या आदेशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब तसेच निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विहीत नमुन्यात, शपथपत्रासह एकत्रित खर्चाचा तपशिल सादर करणे बंधनकारक आहे.

तरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व उमेदवारांनी, पराभूत उमेदवारांनी तसेच निवडून आलेल्या सदस्यांनी विहीत मुदतीत म्हणजे 30 दिवसांच्या आत विहीत रितीने निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाचा अंतीम तपशिल आपल्या तालुक्याचे संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश