Posts

Showing posts from August, 2017

शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसाय सुरु करा - सर्जेराव ढवळे

Image
·         साखरा येथे ‘संवादपर्व कार्यक्रमात कृषीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन वाशिम , दि . ३० : शेतीवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी शेतीला जोडधंदा असणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी शासन विविध योजना राबविते. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु करावेत, असे आवाहन समन्वयीत कृषी समृद्धी प्रकल्प (केम)चे व्यवस्थापक सर्जेराव ढवळे यांनी केले. साखरा येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने व गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने आयोजित ‘संवादपर्व’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी साखराचे उपसरपंच मोहन इंगळे, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष रामराव इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे रामप्रसाद इंगळे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर इंगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, दिलीप काळे, प्रमोद राठोड, ग्राम कार्यकर्ता सुखदेव इंगळे आदी उपस्थित होते. श्री. ढवळे म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचे शेतीवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पन्नाची इतर साधने निर्माण होणे आवश्यक आहे. त्

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी गट शेती उत्तम पर्याय - अभिजीत देवगिरीकर

Image
·          केकतउमरा येथे ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात नागरिकांशी संवाद ·          शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधण्याचे आवाहन वाशिम , दि . २९ : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमधील उत्पादन खर्च कमी होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाने गट शेतीला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले असून गट शेती हा उत्पादन खर्चात बचतीचा उत्तम पर्याय आहे, असे मत वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजीत देवगिरीकर यांनी व्यक्त केले. केकतउमरा येथे शिवभक्त गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सोमवारी आयोजित ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, दिलीप काळे उपस्थित होते. श्री. देवगिरीकर म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी शासनाने कृषी विषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. यासाठीच ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान राज्यात राबविले जात आहे. या माध्यमातून ट्रॅक्टर, विविध स्वयंचलित अवजारे, सिंचन साधने यासाठी अनुदान उपलब्ध करून

सर्व गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्या - किशोर तिवारी

Image
·         जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध योजनांचा आढावा ·         केम, आत्माच्या माध्यमातून शेतीपूरक रोजगार निर्मिती करा ·         शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा वाशिम , दि . २२ : जिल्ह्यातील सर्व गरीब वंचित कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना कै. वसंतराव शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी त्यांनी कृषी, आरोग्यविषयक योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. डी. एल. जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, जिल्हा प

गणेशोत्सवात मातीपासून बनलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
वाशिम , दि . १६ : गणेशोत्सव साजरा करताना यावर्षी सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मातीपासून बनविण्यात आलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज गणेशोत्सव व बकरी ईद निमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय महसूल अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपाधीक्षक श्री. घुगे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांचे प्रभारी, शांतता समितीचे सदस्य व गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी पासून बनविण्यात आलेल्या जास्त उंचीच्या मुर्त्यांचे विसर्जन केल्यानंतर

पालकमंत्री संजय राठोड यांनी केली प्लॅनेटोरियम, अॅडव्हेंचर पार्कच्या कामाची पाहणी

Image
वाशिम , दि . १५ : महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी येथे सुरु असलेल्या प्लॅनेटोरियम, अॅडव्हेंचर पार्कच्या कामाला भेट दिली व कामांची पाहणी केली. तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, तहसीलदार बळवंत अरखराव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे आदी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम प्लॅनेटोरियमची निर्मिती व अॅडव्हेंचर पार्कचे काम सुरु आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री ना. राठोड यांनी दोन्ही कामांची पाहणी केली. यावेळी गणेश इनोव्हेशनचे बी. एस. देशमुख यांनी प्लॅनेटोरियममध्ये बसविण्यात येणाऱ्या प्रतिकृतींची, फोर के सिस्टीम यासह इतर बाबींची माहिती दिली.  यावेळी पालकमंत्र्यांनी प्लॅनेटोरियम, अॅडव्हेंचर पार्कचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘आपला जिल्हा’ पुस्तिकेचे प्रकाशन

Image
वाशिम ,  दि .  १५  :   वाशिम जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक माहितीचा समावेश असलेली ‘आपला जिल्हा’ पुस्तिका वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप उपस्थित होते. ‘आपला जिल्हा’ पुस्तिकेमध्ये वाशिमची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जिल्ह्याची वैशिष्ट्ये, लोकसंख्या, भौगोलिक माहिती देण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी पुस्तिकेचे संपादन केले असून या पुस्तिका निर्मितीसाठी तानाजी घोलप, दिलीप काळे, राजू जाधव, विजय राठोड, प्रमोद राठोड, विश्वनाथ मेरकर यांनी योगदान दिले आहे.

कृषी विकासाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना दिलासा - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         वाशिम येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण ·         टोकन वाटप केलेल्या शेतकऱ्यांची तूर ३१ ऑगस्टपर्यंत खरेदी करणार ·         नागपूर-मुंबई कृषी समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्याचा विकासाला गती मिळणार वाशिम , दि . १५ : शेती व शेतकरी यांच्या विकासावर शासनाचा विशेष भर आहे. जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासारख्या जलसंधारण व कृषी विकासाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम पालकमंत्री ना. राठोड यांच्या ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांना पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, वाश

वन्य प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी वन क्षेत्रालगत चर निर्मिती करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         जिल्हा नियोजन समिती सभेत विविध विषयांवर चर्चा ·         जिल्हा वार्षिक योजनेतील प्रत्येक काम दर्जेदार करण्याच्या सूचना वाशिम , दि . १४ :   जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. त्यामुळे वन क्षेत्रालगत खोल चर निर्मिती करून वन्य प्राण्यांना शेतामध्ये येण्यापासून रोखता येणे शक्य आहे. याकरिता वन विभागाने प्रायोगिक तत्वावर प्रत्येक तालुक्यातून एक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री ना. राठोड म्हणाले, वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसा

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना उत्तर लेखनाचा सराव आवश्यक - सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया

Image
·         जिल्हा प्रशासनाची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा ·         नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे यांनीही केले मार्गदर्शन ·         युपीएससी, एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीचा दिला कानमंत्र वाशिम , दि . ०५ : केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव असणे आवश्यक असल्याचे यवतमाळचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. आसिया हे युपीएससीच्या २०१६ मधील बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी विद्यार्थांना युपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यासह मुलाखतीच्या पूर्वतयारी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, एमपीएससी परीक्षा विषयक मार्गदर्शक व वाशिम तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे, समाज कल्याण विभागाचे विशे