पालकमंत्री संजय राठोड यांनी केली प्लॅनेटोरियम, अॅडव्हेंचर पार्कच्या कामाची पाहणी
वाशिम, दि. १५ : महसूल राज्यमंत्री तथा
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी येथे सुरु असलेल्या प्लॅनेटोरियम,
अॅडव्हेंचर पार्कच्या कामाला भेट दिली व कामांची पाहणी केली. तसेच ही कामे लवकरात
लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी
राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपविभागीय
अधिकारी अभिषेक देशमुख, तहसीलदार बळवंत अरखराव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश
शेटे आदी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम प्लॅनेटोरियमची
निर्मिती व अॅडव्हेंचर पार्कचे काम सुरु आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
पालकमंत्री ना. राठोड यांनी दोन्ही कामांची पाहणी केली. यावेळी गणेश इनोव्हेशनचे
बी. एस. देशमुख यांनी प्लॅनेटोरियममध्ये बसविण्यात येणाऱ्या प्रतिकृतींची, फोर के
सिस्टीम यासह इतर बाबींची माहिती दिली. यावेळी
पालकमंत्र्यांनी प्लॅनेटोरियम, अॅडव्हेंचर पार्कचे काम लवकरात लवकर पूर्ण
करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्लॅनेटोरियम व अॅडव्हेंचर पार्क सुरु
झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील पर्यटनास चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी
व्यक्त केला.
Comments
Post a Comment