पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘आपला जिल्हा’ पुस्तिकेचे प्रकाशन



वाशिमदि१५ : वाशिम जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक माहितीचा समावेश असलेली ‘आपला जिल्हा’ पुस्तिका वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप उपस्थित होते.
‘आपला जिल्हा’ पुस्तिकेमध्ये वाशिमची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जिल्ह्याची वैशिष्ट्ये, लोकसंख्या, भौगोलिक माहिती देण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी पुस्तिकेचे संपादन केले असून या पुस्तिका निर्मितीसाठी तानाजी घोलप, दिलीप काळे, राजू जाधव, विजय राठोड, प्रमोद राठोड, विश्वनाथ मेरकर यांनी योगदान दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे