Posts

Showing posts from March, 2023

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद

Image
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद   मुंबई, दि. 31 : राज्यातील अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या निधीत दरवर्षी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मागील चार आर्थिक वर्षांमध्ये  सन 2019-20 या वर्षी 9 हजार 208 कोटी, 2020-21 या वर्षी 9 हजार 668 कोटी, 2021-22  या वर्षी 10 हजार 635  कोटी, 2022-23  या वर्षी 12 हजार 230 आणि २०२३ - २४ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ८२०  कोटी रूपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मागासवर्गाच्या निधीत कपात करण्यात आली नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.               अर्थसंकल्पीय अंदाज हे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केले जाते. वर्षभरात गरजेनुसार त्यामध्ये बदल अपरिहार्य ठरतो. विविध योजनांमधील अखर्चित निधी इतर योजनांसाठी पुनर्विनियोजित करुन उपलब्ध करुन दिला जातो. त्यामुळे  चालू  आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पात योजनांच्या तरतुदींमध्ये घट  करण्यात आली असल्याचे म्हणता येणार नाही, असेही सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केले आहे.            

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदत

Image
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा   जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदत वाशिम दि.३० (जिमाका) जिल्ह्यातील एकूण सहा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.या निवडणूककरिता नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.परंतु अनेक उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांना निवडणूक लढवण्यापासून वंचित राहण्याची वेळ येईल.ही बाब शासनस्तरावर लक्षात आल्याने या निवडणूकीत राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास बारा महिन्याची मुदतवाढ देण्याबाबत शासनाने आदेश काढले आहेत.तरी संबंधित उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करण्यास शासनाने मुभा दिली आहे.शासनाच्या या निर्णयामुळे राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना फायदा होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत

पोहरादेवी येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतले दर्शन

Image
पोहरादेवी येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतले दर्शन  वाशिम दि.३०(जिमाका) नवमी यात्रोत्सवानिमित्ताने पोहरादेवी येथे आज ३०मार्च रोजी पालकमंत्री संजय राठोड यांनी जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी श्री.राठोड यांनी धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा १२ हजार ४७८ शेतकऱ्यांना लाभ ३२ कोटी ९० लक्ष रुपये अनुदानाचे वितरण १३७७ शेतकऱ्यांना फळबाग तर ५८९९ शेतकऱ्यांना तुषार संच वाटप

Image
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा १२ हजार ४७८ शेतकऱ्यांना लाभ  ३२ कोटी ९० लक्ष रुपये अनुदानाचे वितरण   १३७७ शेतकऱ्यांना फळबाग तर ५८९९ शेतकऱ्यांना तुषार संच वाटप  वाशिम दि.३०(जिमाका)अलीकडच्या काळात हवामानात झालेल्या लक्षणीय बदलांमध्ये कृषी क्षेत्रापुढे मोठी आव्हाने उभी राहत आहे.हवामान बदलानुकूल कृषी विकासाकरिता तसेच प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना घटत्या उत्पन्नामुळे तणावग्रस्त न होता पूर्वीच्या सुस्थितीत ताबडतोब पुनर्स्थापित होता यावे म्हणून कृषी क्षेत्र व पर्यायाने शेतकऱ्यांनी सक्षम व्हावे यासाठी हवामान अनुकूल कृषी प्रकल्प अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) जिल्ह्यातील १४९ गावातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे.या गावातील १२ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना विविध २८ घटकांचा लाभ देऊन त्यांच्या बँक खात्यात ३२ कोटी ९० लक्ष ७६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.               अवकाळी पाऊस व गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. परिणामी तीव्र दुष्काळ किंवा टंचाईसदृश्य परिस्थिती होवून त्याचा परिणाम कृषी उत्पादन व उत्पादकतेवर मोठ्या

पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात

Image
पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात  वाशिम दि.३०(जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे आज 30 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौरा येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ११ वाजता शासकीय वाहनाने दिग्रसमार्गे पोहरादेवी येथे आगमन, दर्शन व राखीव.दुपारी १ वाजता पोहरादेवी येथून दारव्हा तालुक्यातील धामणगाव(देव) कडे प्रस्थान करतील.

जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Image
जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर वाशिम,दि.२९(जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ऍड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाच्या संयुक्त वतीने जिल्हा कारागृह वाशीम येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.अध्यक्षस्थानी न्या.एन.आर. प्रधान होते. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.विजय टेकवानी,ऍड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे,तुरुंग अधिकारी भीमराव राऊत,प्रमुख वक्ते ऍड. सतीश सुर्वे,ऍड.शुभांगी खडसे,प्रा.डॉ. सागर सोनी,प्रा.भाग्यश्री धुमाळे, ऍड.सज्जनसिह चंदेल यांची उपस्थिती होती.                 ऍड.सुर्वे यांनी कैद्यांच्या हक्कांबद्दल कायदेशीर जागरूकता आणि कायदेशीर सेवेसाठी त्यांचे हक्क, ऍड.श्रीमती खडसे यांनी न्यायालयासमोर कैद्यांचे प्रतिनिधित्व सूचित करणे या विषयांवर मार्गदर्शन केले.डॉ.चिमणे,न्या.टेकवानी यांनी देखील मार्गदर्शन केले.       अध्यक्षीय भाषणातून न्या.श्री. प्रधान यांनी बंदीजनांच्या अधिकाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन विधी स्वयंसेवक सुशील भिमजियानी यांनी केले.आभार तुरुंगाधिकारी भि

चार पुरस्कारार्थीना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

चार पुरस्कारार्थीना  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण  वाशिम दि. 29 (जिमाका) महिला आणि बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतात.सन 2014 - 15 ते सन 2017 - 18 या कालावधीतील चार पुरस्काराचे वितरण आज 29 मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.       सन  2014 -15 चा पुरस्कार श्रीमती वंदना कंकाळ यांना,सन 2015 - 16 चा पुरस्कार श्रीमती लक्ष्मी माहुरे यांना, सन 2016-17 चा पुरस्कार श्रीमती संध्या सरनाईक यांना आणि सन 2017-18  चा पुरस्कार एड. श्रीमती भारती सोमाणी यांना प्रदान करण्यात आला.चारही पुरस्कारार्थीना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री.षण्मुगराजन  आणि श्रीमती पंत यांनी सन्मानीत केले.         यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी,परिविक्षा अधिकारी गजानन पडघन,प्रभारी जिल्हा संरक्षण अधिकारी बंडू धनगर,संरक्षण अधिकारी भगवान ढो

शेती शाळेतून दिली पीक लागवड तंत्रज्ञान ते पीक कापणीची माहिती 255 शेतीशाळेतून 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
शेती शाळेतून दिली पीक लागवड तंत्रज्ञान ते पीक कापणीची माहिती  255 शेतीशाळेतून 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन  वाशिम दि.28 (जिमाका) जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते.काही शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतावरून संरक्षित सिंचनाची व्यवस्था करतात. जिल्ह्यात सोयाबीन हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते.कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती पद्धतीला छेद देऊन आधुनिक पद्धतीने कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी व त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घ्यावे हा शेतीशाळेमागचा उद्देश आहे. सन 2022 - 23 या वर्षात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून पिकाचे लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन ते पीक काढणीबाबतच्या खरीप आणि रब्बी हंगामात एकूण 255 शेतीशाळा घेण्यात आल्या. या शेती शाळेमध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कृषी सहायकांनी 7 हजार 650 शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.        खरीप हंगामात 174 शेतीशाळा घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असता 1

अंतर्गत सामुदाय विकास योजनेच्यावतीने एकदिवशीय दुरूस्ती शिबीर संपन्न

Image
अंतर्गत सामुदाय विकास योजनेच्यावतीने एकदिवशीय दुरूस्ती शिबीर संपन्न वाशिम,दि.२८ (जिमाका) केंद्रीय प्रशिक्षण संचालनालय,नवी दिल्ली यांच्याकडून ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा व त्यांचा तांत्रिकटृष्टया सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन वाशिमअंतर्गत सामुदाय विकास योजनेच्यावतीने केकतउमरा येथे २४ मार्च रोजी एकदिवसीय मोफत दुरूस्ती शिबीर घेण्यात आले.           या दुरुस्ती शिबिरात दुचाकी वाहन, गँस शेगडी, विद्युत उपकरण दुरुस्ती, लाइट फिटीग व मिक्सर कुकर, इत्यादी दुरुस्ती करण्यात आली. एकुण लाभार्थी संख्या ४० टु व्हीलर रिपेअर, ३५ शिलाई मशिन, ३६ गॅस शेगडी, कुकर मिक्सर, ३० विद्युत उपकरण, मोबाईल रिपेअरींग दुरुस्ती या प्रकारे ग्रामस्थांनी शिबीराचा लाभ घेवून उत्तम प्रतिसाद दिला.            उद्धघाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.बा,ग.गवलवाड होते.प्रमुख पाहणे केकतउमरा येथील जि.प. मुख्याध्यापक राम वाणी,अंतर्गत समन्वयक(सी.डी.टी.पी.योजना) एल. के.लोणकर,केकतउमरा येथील उपसरपंच नागेश वाठ,पंचायत समिती सदस्य श्री.पुंड यांच्

माविमच्या प्रदर्शनातून 6 लक्ष रुपयांची विक्री जिल्हास्तरीय साहित्य विक्री व प्रदर्शनाचा समारोप

Image
माविमच्या प्रदर्शनातून  6  लक्ष रुपयांची विक्री जिल्हास्तरीय साहित्य विक्री व प्रदर्शनाचा समारोप         वाशिम, दि. 28 (जिमाका) :  बचत गटांच्या उत्पादनांना  बाजारपेठ मिळावी यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 24 ते 27 मार्च 2023 दरम्यान विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे करण्यात आले.             यामध्ये जिल्हातील विविध 48 बचतगटांनी सहभाग नोंदवत आपले उत्पादन विक्रीकरीता आणले होते. त्यांच्या उत्पादनास वाशिमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बचतगटांतील महिलांद्वारा उत्पादित वस्तू विना केमिकल, पौष्टीक,रुचकर व आकर्षक असल्याने मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामध्ये मांडे, मटण, पुरण पोळी, कुरडया, पापड, शोभेच्या वस्तू आदी विविध पदार्थ व वस्तू होत्या. प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार यांची प्रमुख उपस्थि‍ती होती. मान्यवरांनी बचत गटांच्या विविध स्टॉलला भेट देवून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश

अत्यल्प शेतीतून तीन भावंडांनी धरली विषमुक्त भाजीपाला शेतीची कास व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून भाजीपाल्याची विक्रीशेणखत व दशपर्णी अर्क व फळांपासूनच्या टॉनिकचा शेती व पिकांसाठी वापर

Image
अत्यल्प शेतीतून तीन भावंडांनी धरली विषमुक्त भाजीपाला शेतीची कास   व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून भाजीपाल्याची विक्री शेणखत व दशपर्णी अर्क व फळांपासूनच्या टॉनिकचा शेती व पिकांसाठी वापर वाशिम,दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करतात.काही शेतकरी संरक्षित सिंचनाच्या सुविधेचा वापर करून बारमाही पिके घेत आहे.काही शेतकरी तर अत्यल्प शेतीतून सुध्दा विविध प्रयोग करून पिकांचे उत्पादन घेत आहे.वाशिमपासून 18 किलोमीटर अंतरावर कारंजामार्गावर असलेल्या बिटोडा (तेली) येथील राऊत भावंडांनी केवळ दीड एकर शेतीत घाम गाळून विषमुक्त भाजीपाल्याच्या शेतीची कास धरून इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.       बिटोडा (तेली) येथील अशोक राऊत यांच्याकडे केवळ दीड एकर शेती.त्यांना सदाशिव,देवीदास आणि संदीप ही तीन विवाहित मुले. तीनही भावंडांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले.आपल्या वडिलांनी याच शेतीच्या भरवशावर आपले पालनपोषण केल्याची जाणीव ठेवून वडिलांच्या उतारवयात त्यांना आता शेतीत कष्ट करण्याची वेळ येऊ नये, यासाठी तिन्ही भावंडांनी सेंद्रि

३१ मार्चपर्यंत पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

Image
३१ मार्चपर्यंत पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा वाशिम,दि.२८ (जिमाका) जिल्हयातील नोकरी / रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्यावतीने २९ मार्च ते ३१ मार्च पर्यत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे.               या रोजगार मेळाव्यामध्ये १) एलआयसी ऑफ इंडिया शाखा वाशिम २) परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद ३) पिपल ट्री व्हेंचर्स प्रायक्हेट लिमिटेड इत्यादी नामांकित कंपन्या/उद्योगाकडील उद्योजक वा त्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे नोकरी इच्छूक उमेदवाराना खाजगी नोकरी/रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे.        याकरीता १०वी,१२ वी, आय.टी.आय. फिटर/वेल्डर/टर्नर ट्रड), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान), इंजिनिअरींग डिप्लोमा इ. शैक्षणीक पात्रता असणारे वयोमर्यादा - १८ ते ४५ मधील युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून विविध प्रकारच्या पदनामांकरीता ५० संख्येपेक्षा जास्त रिक्तपदावर रोजगार मिळवण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याव्दारे प्राप्त होणार

जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Image
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू    वाशिम दि.27(जिमाका) जिल्ह्यात 22 मार्च रोजी मराठी नूतन वर्ष गुढीपाडवा साजरा करण्यात आला.24 मार्च रोजी मुस्लिम धर्मीयांच्या रमजान मासाला सुरुवात झाली आहे. 30 मार्च रोजी रामनवमी उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.रामनवमी पर्वावर मानोरा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या श्री.क्षेत्र पोहरादेवी येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.           सद्यस्थितीत विविध पक्ष/ संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळ्या मागण्याकरिता धरणे/आंदोलने/ उपोषणे करण्यात येत आहे.जिल्हा सण,उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे.जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये 31 मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री.षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.

पोहरादेवी येथे मंदिर परिसरात कलम 144 लागूमंदिरासमोर बोकड बळीची प्रथा बंद

Image
पोहरादेवी येथे मंदिर परिसरात कलम 144 लागू मंदिरासमोर बोकड बळीची प्रथा बंद  वाशिम दि.27 (जिमाका) बंजारा समाजाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे 26 ते 31 मार्च  दरम्यान जगदंबा देवीची भव्य यात्रा भरणार आहे.या यात्रेमध्ये राज्यातून तसेच कर्नाटक, तेलंगाना,आंध्रप्रदेश, गुजरात व राजस्थान राज्यातून दोन ते अडीच लाख बंजारा समाज बांधव येणार आहेत. भाविक आपला नवस करण्यासाठी मंदिराच्या दूर अंतरावर जाऊन बोकड बळी देऊन आपला नवस फेडतात.न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जगदंबा देवीच्या मंदिरासमोर बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली आहे.       पोहरादेवी येथील जगदंबा देवीच्या यात्रेमध्ये बोकड बळी प्रथेवरील बंदीमुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र रोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुख्य मंदिराचे मंडप व त्या लगतच्या 200 मीटर यात्रा परिसरात परिस्थिती हाताळण्याकरिता 31 मार्च 2023 पर्यंत फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री.षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे.

आमदार ऍड किरणराव सरनाईक यांची माविमच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला भेट

Image
आमदार ऍड किरणराव सरनाईक यांची माविमच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला भेट वाशिम दि.27(जिमाका) सन 2001 पासून जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाची सुरुवात करून महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्हात  मोठया संख्येने महीला बचत गटांची स्थापना केली आहे.अनेक बचतगटाच्या महिला आज विविध छोटे छोटे उद्योग सुरू करून कुटुंबाला हातभार लावत आहे. कुटुंबाच्या अर्थकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.असे प्रतिपादन आमदार ऍड.किरणराव सरनाईक यांनी केले.          रविवारी आमदार श्री.सरनाईक यांनी महिला विकास महामंडळाच्या वतीने विठ्ठलवाडी येथे आयोजित नवतेजस्विनी जिल्हास्तरीय वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाला भेट दिली.भेटीदरम्यान ते बोलत होते.             माविमचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य असून यामुळे बचत गटातील महिलांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.माविमद्वारे  जिल्ह्यात सूरू असणारे  महिला सक्षमीकरणाचे कार्य खरोखर  कौतुकास्पद असून माविमच्या कार्यास  आमदार सरनाईक यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.      यावेळी श्री.के टी देशमुख,जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सम

जिल्ह्यात महिला उद्योजिका तयार होत आहेत ही आनंदाची बाब खा.भावनाताई गवळी माविमच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला भेट

Image
जिल्ह्यात महिला उद्योजिका तयार होत आहेत ही आनंदाची बाब              खा.भावनाताई गवळी   माविमच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला भेट वाशिम दि.२७ (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्हयात ४ हजार महीला बचत गटांची स्थापना केली आहे. महिलांना सक्षम करण्याकरिता बँकांनी आजपर्यंत १८१ कोटी रुपये अर्थसहाय्य केले आहे.त्यामुळेच माविमच्या बचतगटातील महिला ह्या व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत.ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. असे गौरवपुर्ण उदगार खासदार भावनाताई गवळी यांनी काढले.            महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विठ्ठलवाडी, वाशिम येथे आयोजित नवतेजस्विनी जिल्हास्तरीय वस्तू विक्री व प्रदर्शनाला रविवारी त्यांनी भेट दिली.यावेळी त्या बोलत होत्या.          माविम नेहमी महिलांच्या विकासात विशेष कामगिरी करीत असुन नवं तेजस्विनी प्रदर्शन व विक्रीमुळे जिल्हयातील बचत गटातील महिलांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे सांगून माविमच्या या कार्यास खासदार श्रीमती गवळी यांनी शुभेच्छा दिल्या.           यावेळी माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार,

बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा

Image
बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका            जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे  उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा  वाशिम दि.25 (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळाने  राज्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र करून त्यांच्या सक्षमीकरणाला सुरुवात केली. त्यामुळेच आज जिल्ह्यातील प्रत्येक  गावात महिलांचे बचत गट कार्यरत आहे. बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याच्या विक्रीतून महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणाला हातभार लागत आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.             24 मार्च रोजी विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन श्री. ठाकरे यांनी केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.               प्रमुख अतिथी म्हणून मंगर

*क्षयरोग दिनानिमित्त रॅली* क्षयरोगाबाबत केली जनजागृती

Image
*क्षयरोग दिनानिमित्त रॅली*   क्षयरोगाबाबत केली जनजागृती वाशिम,दि.२४ (जिमाका) जिल्हा क्षयरोग केंद्र, वाशिमच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग जनजागरण रॅलीचे आयोजन आज २४ मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे  करण्यात आले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळबांडे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस व्ही. देशपांडे,जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.मिलींद जाधव, डॉ.यादव,अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर, डॉ.हेडाऊ,डॉ.बगाटे,डॉ.बाहेती, डॉ.देवळे,डॉ.साबू डॉ.गोरे,श्री.गुलाटी यांची उपस्थिती होती.        रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग कॉलेज प्रशिक्षण विद्यालय,नॅझरीन नर्सिंग कॉलेज,मदर टेरेसा नर्सिंग कॉलेज,माँ.गंगा नर्सिंग कॉलेज व मानसी नर्सिंग कॉलेज, सावित्रीबाई फूले नर्सिंग विद्यालय,गोविंदराव देंशपाडे नर्सिंग कॉलेज,राजश्री शाहु कॉलेज,श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्र,जिल्हा कुष्ठरोग कार्यालय, एआरटी सेंटर व जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.      ड

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

Image
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन        वाशिम, दि. 23 (जिमाका) : 24 मार्च 2023 रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीच्या जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य “ होय, आपण टिबी संपवू शकतो ” हे आहे. याच धर्तीवर क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्ताने सर्वस्तरावर प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियान ही मोहिम राबविली जाणार आहे. क्षयरोगाबाबत लक्षणे असल्यास सर्व शासकीय रुग्णालयाशी संपर्क करावा. तसेच 1800116666 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन अधिक माहिती मिळविता येईल.           जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या वतीने 24 मार्च रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. टिबीमुक्त भारत अभियान, रांगोळी स्पर्धा व मायकिंगव्दारे जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे. क्षयरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसोबत जनतेचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. लोकजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सुरु केला आहे. जिल्हा क्षयरोग कार्यालय येथे सकाळी 8 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीला जिल्हा शल्य चिकी

जयपूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात

Image
जयपूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात वाशिम,दि.२३(जिमाका) गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने वाशिम तालुक्यातील जयपूर येथील बिरबलनाथ महाराज मंदिरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवाणी होते.मंचावर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र सोलव,सरपंच प्रेम बर्गी,उपसरपंच द्वारकाबाई इंगोले, टेली लॉयर ऍड. शुभांगी खडसे, विधी स्वयंसेवक मंगेश गंगावने, प्रभू कांबळे आदींची उपस्थिती होती.              यावेळी ऍसिड हल्ला या विषयावर ऍड.शुभांगी खडसे यांनी, प्रदूषण तसेच स्वच्छ हवा व पाण्याचा अधिकार या विषयावर मंगेश गंगावने यांनी तर जलसंवर्धन या विषयावर प्रभू कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवींद्र सोलव यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.          अध्यक्ष म्हणून बोलताना श्री. टेकवाणी म्हणाले की,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने मोफत विधी सहाय्य दिले जाते.त्या कामाकरिता वंचित व गरजू लोकांसाठी शासनाने वकील नियुक्त केलेले असून कायदेशीर लढ्यामध्ये त्यांचे सहकार्य जनतेला

24 ते 27 मार्च दरम्यानमाविमच्या बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा

Image
24 ते 27 मार्च दरम्यान माविमच्या बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा  वाशिम दि. 23 (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय नवतेजस्विनी प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे 24 ते 27 मार्च दरम्यान विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे आयोजन करण्यात आले आहे. 24 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शन व विक्री समारंभाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड हे करतील.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे असतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार भावना गवळी,खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री एड. किरणराव सरनाईक,वसंत खंडेलवाल,धीरज लिंगाडे,लखन मलिक,राजेंद्र पाटणी,अमित झनक जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक दिनेश बारापात्रे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी व जिल्हा उद

पर्यटन मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची शिरपुर येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदीराला भेट अंगणवाडी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची केली पाहणी

Image
पर्यटन मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची शिरपुर येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदीराला भेट अंगणवाडी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची केली पाहणी         वाशिम, दि. 21 (जिमाका) :  पर्यटन, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आणि महिला व बाल विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मालेगाव तालुक्यातील शिरपुर (जैन) येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदीराला भेट देऊन पार्श्वनाथाचे दर्शन घेतले.           सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल 42 वर्षानंतर शिरपुर येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर खुले केल्यानंतर श्वेतांबर व दिगंबर या जैन धर्मातील पंथीयांमध्ये मूर्ती लेपनावरुन वाद निर्माण झाला होता.मंत्री श्री. लोढा यांनी दोन्हीही पंथीयांच्या मंदिर विश्वस्त व सदस्यांची भेट घेऊन सामोपचाराने प्रकरणावर तोडगा काढून शांती प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.यावेळी श्री लोढा यांनी निकलंक भवन येथे मुनीश्री योगसागरजी महाराज आणि मुनीश्री सिद्धांतसागरजी महाराज यांची तर पारसबाग येथे पन्यासप्रवर श्री.विमलहंस विजयजी महाराज आण

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आज जिल्ह्यात

Image
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आज जिल्ह्यात  वाशिम दि. 21 (जिमाका) पर्यटन, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता,महिला व बाल विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा हे आज 21 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 8.30 वाजता शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने शिरपूरकडे प्रया. सकाळी 11:30 शिरपूर येथे आगमन.सकाळी 11:45 वाजता श्री.अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन तीर्थ शिरपूर येथे नागरिकांची संवाद साधतील व राखीव. दुपारी 3 वाजता शिरपूर येथून शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी  वाशिम दि.20(जिमाका) जिल्ह्यात मागील दोन दिवसात आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पाहणी आज 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर,मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,वाशिम तहसीलदार श्री.मालठाणे,मंगरुळपीरचे प्रभारी तहसीलदार रवी राठोड,वाशिम तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड व मंगरुळपीर तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांची  प्रामुख्याने उपस्थिती होती.     वाशिम तालुक्यातील कळंबा (महाली) येथील नुकसान झालेल्या शेतीतील पिकाची पाहणी केली. मंगरूळपीर तालुक्यातील झाडगाव येथील गोपाल शिंदे यांच्या कांदा बियाणे पिकाची, दिलावलपूर येथील अनंत ठोंबरे यांच्या शेतातील कांदा, पपई,गहू व लिंबू पिकाच्या नुकसानीची,चहाल येथील शेतकरी सुनील चौधरी यांच्या कोबी,फुलकोबी व टोमॅटो पिकाची व गंगाराम राठोड यांच्या टरबूज पिकाच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली.      

*अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे नुकसान**तातडीने पंचनामे करण्याच्या पालकमंत्री राठोड यांच्या सूचना*

Image
*अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे नुकसान* *तातडीने पंचनामे करण्याच्या पालकमंत्री राठोड यांच्या सूचना*  वाशिम,दि १८ (जिमाका) काल व आज आलेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.          पालकमंत्री श्री.राठोड यांनी आज जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन एस.यांचेशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी हा झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही,यासाठी काळजीपूर्वक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. झालेल्या नुकसानीचा अहवाल पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे पाठविण्यात यावा.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांना सांगितले.   पालकमंत्र्यांना माहिती देतांना श्री. षण्मुगराजन म्हणाले,सर्व तहसिलदारांना नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.  जिल्हयात कालपासून अवकाळी पाऊस सुरू असून वादळी वारेही वाहत आहे.मालेगा

बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणास मदत जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे वऱ्हाडी जत्रेचे उद्घाटन

Image
बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणास मदत              जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे                  वऱ्हाडी जत्रेचे उद्घाटन वाशिम दि 18 (जिमाका) बचत गटांच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या आहेत. केवळ एकत्र येऊन त्या थांबला नाहीत,तर त्यांनी उद्योग व्यवसायाला सुरुवात केली आहे. अशाप्रकारच्या प्रदर्शनातून त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होत आहे.बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या सक्षमीकरणाला मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.              आज जिल्हा क्रीडा संकुल येथे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त वतीने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थाचे प्रदर्शन व विक्री अर्थात वऱ्हाडी जत्रेचे उद्घाटन करताना आयोजित कार्यक्रमात श्री. ठाकरे बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे,जि.प सदस्य पांडुरंग ठाकरे, दत्ता तुरक, कारंजा पंचा

18 ते 20 मार्च दरम्यानमहिला बचतगटांच्या उत्पादीत खाद्यपदार्थ व वस्तूंचे विभागीय प्रदर्शन प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे वसुमना पंत यांचे आवाहन

Image
18 ते 20 मार्च दरम्यान महिला बचतगटांच्या उत्पादीत खाद्यपदार्थ व वस्तूंचे विभागीय प्रदर्शन   प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे वसुमना पंत यांचे आवाहन  वाशिम दि.17(जिमाका) ग्रामविकास व पंचायतराज विभाग,विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. वाशिमच्या संयुक्त वतीने  18 ते 20 मार्च दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथील मैदानावर अमरावती विभागातील महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या खाद्यपदार्थाच्या व वस्तूचे विभागीय प्रदर्शन व विक्री अर्थात वर्‍हाडी जत्रेला जिल्हावासीयांनी मोठया संख्येने भेट देवून लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.           16 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्र परिषदेत त्यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.यावेळी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांची प्रमुख उपस्थिती होती.              श्रीमती पंत म्हणाल्या की, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ व साहित्याला व्या

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत बँकांची भूमिका महत्त्वाची मेघनाथ कांबळे कृती संगम कार्यशाळा

Image
कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत बँकांची भूमिका महत्त्वाची                          मेघनाथ कांबळे  कृती संगम कार्यशाळा  वाशिम दि 16 (जिमाका) देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. केवळ शेतीवर अवलंबून राहून शेती न करता त्याला शेतीपूरक व्यवसायांची जोड देणे आवश्यक आहे.आज शेतीला मजुरांचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहे.काढणी पश्चात सुविधा निर्माण झाल्या तर शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासोबत शेतीपूरक व्यवसायाला गती देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी केले.              आज नियोजन समितीच्या सभागृहात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेवरील कृती संगम कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. कांबळे बोलत होते.यावेळी मंचावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनेश बारापात्रे,रेशीम

शासकीय तंत्रनिकेतन येथे महिला दिन उत्साहात साजरा

Image
शासकीय तंत्रनिकेतन येथे महिला दिन उत्साहात साजरा  वाशिम दि.16 (जिमाका) शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ बी. जी. गवलवाड होते. मार्गदर्शक म्हणून ऍड.सुचिता कुलकर्णी व ऍड.श्वेता खंडेलवाल यांची उपस्थिती होती.         यावेळी ऍड.कुलकर्णी व ॲडव्होकेट खंडेलवाल यांनी उपस्थित विद्यार्थिनींना पोस्को ॲक्ट महिला संरक्षण विषयक अधिकार व कायदे तसेच सायबर क्राईम बाबत विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रम संस्थेतील निर्भया पथक समितीद्वारे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला निर्भया पथक समिती अध्यक्ष मनीषा मोरे,सचिव कल्याणी चौधरी,डॉ. राजवेंद्र बिलोलीकर, श्रीमती रिता भंगाळे,श्रीमती रुख्मा अढाव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिमखाना उपाध्यक्ष राहुल महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.

48 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड

Image
48 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड  वाशिम दि 16 (जिमाका) सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षात शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम येथे अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन नुकतेच करण्यात आले. यामध्ये 48 विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य व नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली.          उद्योगधंद्यांना उपयुक्त असे रोजगारक्षम विद्यार्थी घडवून त्यांना नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, वाशीम येथे एकूण सहा शाखा कार्यरत आहे.प्राचार्य डॉ.बी.जी गवलवाड व टीपीओ यु.आर तोष्णीवाल यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांकरीता कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. यामध्ये देशातील अग्रगण्य व नामांकित बजाज ऑटो व जी.ई इलेक्ट्रिकल प्रा.लि.या कंपन्यांनी कॅम्पस रिक्रुटमेंट प्रक्रिया राबविली. यामध्ये ऑटोमोबाईल,सिव्हील, मेकॅनिकल,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि माहिती व तंत्रज्ञान शाखेतील अंतिम वर्षात शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.        विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक

17 मार्च रोजी वाशीम येथे फेरीवाल्यांसाठी शिबिर

Image
17 मार्च रोजी वाशीम येथे फेरीवाल्यांसाठी शिबिर वाशिम दि.16 (जिमाका) वाशिम नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज मिळालेल्या फेरीवाल्या लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबाला केंद्र सरकारच्या 8 योजनांचा लाभ देण्याकरिता स्वनिधी से समृद्धीअंतर्गत 17 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शहर उपजीविका केंद्र, युनियन बँकेच्या मागे, बालाजी संकुल पहिला माळा,पाटणी चौक, वाशिम येथे सर्व बँक व्यवस्थापकांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.             ज्या कर्ज मिळालेल्या फेरीवाल्या लाभार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,प्रधानमंत्री जनधन योजना, इमारत व इतर बांधकाम कामगार योजना,प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना,जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना,वन नेशन वन रेशनकार्ड या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.         ज्या लाभार्थी व कुटुंब सदस्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी से समृद्धी योजनेचे ऑनलाईन सामाजिक व आर्थिक