जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
वाशिम, दि. 23 (जिमाका) : 24 मार्च 2023 रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीच्या जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य “ होय, आपण टिबी संपवू शकतो ” हे आहे. याच धर्तीवर क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्ताने सर्वस्तरावर प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियान ही मोहिम राबविली जाणार आहे. क्षयरोगाबाबत लक्षणे असल्यास सर्व शासकीय रुग्णालयाशी संपर्क करावा. तसेच 1800116666 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन अधिक माहिती मिळविता येईल.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या वतीने 24 मार्च रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. टिबीमुक्त भारत अभियान, रांगोळी स्पर्धा व मायकिंगव्दारे जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे. क्षयरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसोबत जनतेचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. लोकजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सुरु केला आहे. जिल्हा क्षयरोग कार्यालय येथे सकाळी 8 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे हे हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाला सहकार्य करुन एकजुटीने हातभार लावावा. यामुळे टिबी हारेल व देश जिंकेल असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या अध्यक्षा वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.व्ही देशपांडे यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment