अंतर्गत सामुदाय विकास योजनेच्यावतीने एकदिवशीय दुरूस्ती शिबीर संपन्न

अंतर्गत सामुदाय विकास योजनेच्यावतीने एकदिवशीय दुरूस्ती शिबीर संपन्न

वाशिम,दि.२८ (जिमाका) केंद्रीय प्रशिक्षण संचालनालय,नवी दिल्ली यांच्याकडून ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा व त्यांचा तांत्रिकटृष्टया सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन वाशिमअंतर्गत सामुदाय विकास योजनेच्यावतीने केकतउमरा येथे २४ मार्च रोजी एकदिवसीय मोफत दुरूस्ती शिबीर घेण्यात आले.
          या दुरुस्ती शिबिरात दुचाकी वाहन, गँस शेगडी, विद्युत उपकरण दुरुस्ती, लाइट फिटीग व मिक्सर कुकर, इत्यादी दुरुस्ती करण्यात आली. एकुण लाभार्थी संख्या ४० टु व्हीलर रिपेअर, ३५ शिलाई मशिन, ३६ गॅस शेगडी, कुकर मिक्सर, ३० विद्युत उपकरण, मोबाईल रिपेअरींग दुरुस्ती या प्रकारे ग्रामस्थांनी शिबीराचा लाभ घेवून उत्तम प्रतिसाद दिला. 
          उद्धघाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.बा,ग.गवलवाड होते.प्रमुख पाहणे केकतउमरा येथील जि.प.
मुख्याध्यापक राम वाणी,अंतर्गत समन्वयक(सी.डी.टी.पी.योजना) एल. के.लोणकर,केकतउमरा येथील उपसरपंच नागेश वाठ,पंचायत समिती सदस्य श्री.पुंड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते. 
     शिबीराच्या आयोजनाकरीता एम. सी.सावके,सी.डी.टी.पी योजनेचे कर्मचारी व प्रशिक्षक जी.बी.सावके, एस.पी.मोहोकार,जी.डी.तडस व प्रशिक्षणार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे