*अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे नुकसान**तातडीने पंचनामे करण्याच्या पालकमंत्री राठोड यांच्या सूचना*

*अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे नुकसान*

*तातडीने पंचनामे करण्याच्या पालकमंत्री राठोड यांच्या सूचना* 


वाशिम,दि १८ (जिमाका) काल व आज आलेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
         पालकमंत्री श्री.राठोड यांनी आज जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन एस.यांचेशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी हा झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही,यासाठी काळजीपूर्वक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. झालेल्या नुकसानीचा अहवाल पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे पाठविण्यात यावा.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांना सांगितले.  

पालकमंत्र्यांना माहिती देतांना श्री. षण्मुगराजन म्हणाले,सर्व तहसिलदारांना नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. 
जिल्हयात कालपासून अवकाळी पाऊस सुरू असून वादळी वारेही वाहत आहे.मालेगाव तालुक्यात काही भागात गारपीट झाली आहे.सर्व तहसिलदारांना गारपीट व अवकाळी पावसाने बाधीत झालेल्या क्षेत्रास व्यक्तीशः भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत.बाधित क्षेत्राचे मंडळ अधिकारी,तलाठी,कृषी सहायक यांचे मदतीने तातडीने पंचनामे आणि सर्वेक्षण करून पिक नुकसानीचा अहवाल त्वरित सादर करण्यास निर्देश दिल्याचे श्री.षण्मुगराजन यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.
      नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच,नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनास अहवाल लवकरच सादर करणार असल्याची माहिती श्री.षण्मुगराजन यांनी चर्चेदरम्यान पालकमंत्र्यांना दिली.
       ००००००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे