जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम दि.27(जिमाका) जिल्ह्यात 22 मार्च रोजी मराठी नूतन वर्ष गुढीपाडवा साजरा करण्यात आला.24 मार्च रोजी मुस्लिम धर्मीयांच्या रमजान मासाला सुरुवात झाली आहे. 30 मार्च रोजी रामनवमी उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.रामनवमी पर्वावर मानोरा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या श्री.क्षेत्र पोहरादेवी येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत विविध पक्ष/ संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळ्या मागण्याकरिता धरणे/आंदोलने/ उपोषणे करण्यात येत आहे.जिल्हा सण,उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे.जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये 31 मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री.षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.
Comments
Post a Comment