पोहरादेवी येथे मंदिर परिसरात कलम 144 लागूमंदिरासमोर बोकड बळीची प्रथा बंद
पोहरादेवी येथे मंदिर परिसरात कलम 144 लागू
मंदिरासमोर बोकड बळीची प्रथा बंद
वाशिम दि.27 (जिमाका) बंजारा समाजाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे 26 ते 31 मार्च दरम्यान जगदंबा देवीची भव्य यात्रा भरणार आहे.या यात्रेमध्ये राज्यातून तसेच कर्नाटक, तेलंगाना,आंध्रप्रदेश, गुजरात व राजस्थान राज्यातून दोन ते अडीच लाख बंजारा समाज बांधव येणार आहेत. भाविक आपला नवस करण्यासाठी मंदिराच्या दूर अंतरावर जाऊन बोकड बळी देऊन आपला नवस फेडतात.न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जगदंबा देवीच्या मंदिरासमोर बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली आहे.
पोहरादेवी येथील जगदंबा देवीच्या यात्रेमध्ये बोकड बळी प्रथेवरील बंदीमुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र रोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुख्य मंदिराचे मंडप व त्या लगतच्या 200 मीटर यात्रा परिसरात परिस्थिती हाताळण्याकरिता 31 मार्च 2023 पर्यंत फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री.षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे.
Comments
Post a Comment