जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

वाशिम,दि.२९(जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ऍड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाच्या संयुक्त वतीने जिल्हा कारागृह वाशीम येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.अध्यक्षस्थानी न्या.एन.आर. प्रधान होते. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.विजय टेकवानी,ऍड.रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे,तुरुंग अधिकारी भीमराव राऊत,प्रमुख वक्ते ऍड. सतीश सुर्वे,ऍड.शुभांगी खडसे,प्रा.डॉ. सागर सोनी,प्रा.भाग्यश्री धुमाळे, ऍड.सज्जनसिह चंदेल यांची उपस्थिती होती.     
           ऍड.सुर्वे यांनी कैद्यांच्या हक्कांबद्दल कायदेशीर जागरूकता आणि कायदेशीर सेवेसाठी त्यांचे हक्क, ऍड.श्रीमती खडसे यांनी न्यायालयासमोर कैद्यांचे प्रतिनिधित्व सूचित करणे या विषयांवर मार्गदर्शन केले.डॉ.चिमणे,न्या.टेकवानी यांनी देखील मार्गदर्शन केले.
      अध्यक्षीय भाषणातून न्या.श्री. प्रधान यांनी बंदीजनांच्या अधिकाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन विधी स्वयंसेवक सुशील भिमजियानी यांनी केले.आभार तुरुंगाधिकारी भिमराव राऊत यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर