माविमच्या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर्सला समता दिनदर्शिकेचे वाटप
माविमच्या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर्सला समता दिनदर्शिकेचे वाटप
वाशिम दि.2(जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय येथे 1 मार्च रोजी नवं तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या लिंग समभाव प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्सला जिल्हा माहिती कार्यालयाने समाज कल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश करून तयार केलेल्या समता दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.
सम्यक ट्रस्ट पुणे यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या प्रशिक्षणात दिनदर्शिकेचे वितरण माविमचे विभागीय सहनियंत्रण अधिकारी केशव पवार,जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,सम्यक ट्रस्ट पुणेचे राहुल कोसुरकर व सहायक सहनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्ह्यातील 60 गावातील मास्टर ट्रेनर्स या कार्यशाळेला उपस्थित होते.दिनदर्शिकेतील समाज कल्याणच्या योजना मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून ग्रामस्थ व लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे.
Comments
Post a Comment