अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत वन परीक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांना धनुर्विद्येत सुवर्ण पदक

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत वन परीक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांना धनुर्विद्येत सुवर्ण पदक 

वाशिम दि.13 (जिमाका) पंचकुला (हरियाणा) येथे दिनांक ९ ते १४ मार्च २०२३ दरम्यान सुरु असलेल्या अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत अकोला वन्यजीव परीक्षेत्राचे (काटेपूर्णा- कारंजा सोहळ अभयारण्य)  वन परीक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. 
        या स्पर्धा पंजाब विद्यापीठ मैदानावर पार पडल्या.पवन जाधव यांनी १८० गुणांपैकी १७० गुण प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले.के. चंदन केरला यांनी १६५ गुण प्राप्त करत रौप्य पदक तर एम. जी. पसाया गुजरात यांनी १६० गुण प्राप्त करत कांस्य पदक प्राप्त केले. पारितोषिक वितरण समारंभ करिता श्री.विनित गर्ग पीसीसीएफ हरियाणा,श्री.कोमल शर्मा आयएफएस हरियाणा व इतर मान्यवर उपस्थित होते.
       श्री. पवन जाधव यांनी याआधीसुद्धा धनुर्विद्येत अनेक राष्ट्रिय स्पर्धेत पदके प्राप्त केले असून राष्ट्रिय विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहेत.या स्पर्धेच्या पदक तालिकेतील महाराष्ट्र संघाचे हे दुसरेच सुवर्ण पदक आहे. पवन जाधव यांच्या यशाबद्दल श्री. के अर्जुना उपवनसंरक्षक अकोला ,श्री. अनिल निमजे विभागीय वन अधिकारी वन्यजीव अकोला,अकोला वन विभागातील सर्व वन परीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे