जयपूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात

जयपूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात

वाशिम,दि.२३(जिमाका) गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने वाशिम तालुक्यातील जयपूर येथील बिरबलनाथ महाराज मंदिरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवाणी होते.मंचावर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र सोलव,सरपंच प्रेम बर्गी,उपसरपंच द्वारकाबाई इंगोले, टेली लॉयर ऍड. शुभांगी खडसे, विधी स्वयंसेवक मंगेश गंगावने, प्रभू कांबळे आदींची उपस्थिती होती. 
            यावेळी ऍसिड हल्ला या विषयावर ऍड.शुभांगी खडसे यांनी, प्रदूषण तसेच स्वच्छ हवा व पाण्याचा अधिकार या विषयावर मंगेश गंगावने यांनी तर जलसंवर्धन या विषयावर प्रभू कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवींद्र सोलव यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.
         अध्यक्ष म्हणून बोलताना श्री. टेकवाणी म्हणाले की,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने मोफत विधी सहाय्य दिले जाते.त्या कामाकरिता वंचित व गरजू लोकांसाठी शासनाने वकील नियुक्त केलेले असून कायदेशीर लढ्यामध्ये त्यांचे सहकार्य जनतेला मिळू शकते. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. 
          प्रास्ताविक राजकुमार पडघान यांनी केले.संचालन अश्विनी औताडे यांनी तर आभार विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी स्वयंसेवक मोतीराम खडसे, रत्नदीप इंगोले,मेघा दळवी,शितल बन्सोड, प्रिया पाठक,आकाश राऊत, मिलिंद कांबळे,जगदीश मानवतकर,सिद्धार्थ वानखेडे, उत्तम धाबे, सुनील राठोड, गणेश पंडित,माधव डोंगरदिवे, आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे