24 ते 27 मार्च दरम्यानमाविमच्या बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा

24 ते 27 मार्च दरम्यान
माविमच्या बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा

 वाशिम दि. 23 (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय नवतेजस्विनी प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे 24 ते 27 मार्च दरम्यान विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे आयोजन करण्यात आले आहे. 24 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शन व विक्री समारंभाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड हे करतील.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे असतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार भावना गवळी,खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री एड. किरणराव सरनाईक,वसंत खंडेलवाल,धीरज लिंगाडे,लखन मलिक,राजेंद्र पाटणी,अमित झनक जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक दिनेश बारापात्रे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार माविमचे विभागीय सह नियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांची उपस्थिती राहणार आहे. प्रदर्शन व विक्री मेळाव्यात महिला बचतगटांचे 50 पेक्षा जास्त विविध साहित्य व वस्तू विक्रीचे स्टॉल राहणार आहे. 
        जिल्ह्यातील नागरिकांनी या मेळाव्याला भेट देऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या साहित्य व वस्तूंची खरेदी करून बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व साहित्याला प्रोत्साहन द्यावे.असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे