Posts

Showing posts from August, 2026

जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतप्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधीजिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

Image
जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधी वाशिम, दि. ३१ ऑगस्ट (जिमाका) : न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीतून निकाली काढण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून ती तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल  सुब्रमण्यम यांनी केले आहे. न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून निकाली काढण्यासाठी लोक अदालत हे प्रभावी माध्यम ठरले आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अनेक पक्षकारांची प्रकरणे वेळेत निकाली निघाल्याने त्यांचा वेळ, खर्च आणि मानसिक त्रास वाचतो. तसेच दोन्ही पक्षकारांमधील संबंध सलोख्याचे राहण्यास मदत होते. लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासही मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. येत्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात ...

🏫 शासकीय आदिवासी वसतिगृहांचे खासगीकरण झालेले नाही

Image
🏫 शासकीय आदिवासी वसतिगृहांचे खासगीकरण झालेले नाही आदिवासी विकास विभागाचे स्पष्टीकरण; प्रशासकीय नियंत्रण शासनाकडेच आदिवासी विद्यार्थी वसतिगृहांच्या खासगीकरणाबाबत काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या पूर्णतः चुकीच्या, गैरसमजातून पसरवलेल्या आणि सत्यपरिस्थितीला धरून नसल्याचे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात आदिवासी विकास विभागाची ४९० शासकीय वसतिगृहे असून, त्यांची विद्यार्थी क्षमता ६५ हजार ८४ इतकी आहे. या वसतिगृहांचे नियंत्रण, मालकी आणि संपूर्ण प्रशासकीय कारभार शासनाकडेच आहे. 🤝 व्यक्तिमत्त्व विकासासाठी सामंजस्य करार वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी नागपूर येथील कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचा कालावधी १५ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२८ असा तीन वर्षांचा आहे. संबंधित संस्था स्वयंप्रेरणेने आणि कोणताही मोबदला न घेता विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या संस्थेला वसतिगृहांच्या इमारती, मालमत्ता किंवा प्रशासकीय व्यवस्थापनाचे कोणतेही अधिकार ...

🗳️ वाशिम जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Image
🗳️ वाशिम जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ८ लाख ८५ हजार २६९ मतदारांचा समावेश; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाशिम, दि. ३१ ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी आज ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिसोड, वाशिम आणि कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांतील एकूण ८ लाख ८५ हजार २६९ मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश आहे. 📌 मतदारसंघनिहाय मतदारसंख्या 🔹 रिसोड विधानसभा मतदारसंघ पुरुष : १,५३,२७६ महिला : १,४०,१९५ एकूण : २,९३,४७१ 🔹 वाशिम विधानसभा मतदारसंघ पुरुष : १,६४,८६६ महिला : १,४९,९०६ तृतीयपंथी : ८ एकूण : ३,१४,७८० 🔹 कारंजा विधानसभा मतदारसंघ पुरुष : १,४३,७५० महिला : १,३३,२५९ तृतीयपंथी : ९ एकूण : २,७७,०१८ जिल्ह्यात ४ लाख ६१ हजार ८९२ पुरुष, ४ लाख २३ हजार ३६० महिला आणि १७ तृतीयपंथी, असे एकूण ८ लाख ८५ हजार २६९ मतदार प्रारूप मतदार यादीत आहेत. 📋 १ लाख ३४ हजार २५० मतदारांची नावे प्रारूप यादीत नाहीत गणनापत्रक बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा न केलेल्या १...

🚜 गुजरातच्या आधुनिक शेतीचा अनुभव घेण्यासाठी वाशिमच्या शेतकरी गटांचा अभ्यासदौरा

Image
🚜 गुजरातच्या आधुनिक शेतीचा अनुभव घेण्यासाठी वाशिमच्या शेतकरी गटांचा अभ्यासदौरा फार्मर ग्रुप लीग २०२६च्या जिल्हास्तरीय विजेत्या शेतकरी गटांना गुजरातच्या आधुनिक कृषी क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी! कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतमालाचे मूल्यवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि कृषी उद्योजकतेची माहिती प्रत्यक्ष मिळविण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील विजेत्या शेतकरी गटांचा गुजरात आंतरराज्य अभ्यासदौरा आज वाशिम येथून उत्साहात रवाना झाला. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते अभ्यासदौऱ्याच्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. हा अभ्यासदौरा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, वाशिम यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, आत्मा प्रकल्प उपसंचालक अजय मोरे, स्मार्ट प्रकल्प नोडल अधिकारी निलेश देशमुख यांच्यासह आत्मा व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 🌱 आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास अभ्यासदौऱ्यात शेतकरी आनंद कृषी विद्यापीठातील माहिती केंद्र, फलोत्पादन विभाग आणि प्रात्यक्...

वाचन संस्कृतीला नवी दिशा देणारा जिल्हा ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम

Image
वाचन संस्कृतीला नवी दिशा देणारा जिल्हा ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम जिल्हा ग्रंथालयासाठी आवडीची, उपयुक्त, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी पुस्तके सुचवावीत जिल्हा प्रशासनाचे आवाहन वाशिम,दि.३१ ऑगस्ट (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहाच्या पाठीमागे, सिव्हिल लाईन कडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुसज्ज जिल्हा ग्रंथालय आहे. जिल्हा ग्रंथालयात जवळपास ६४ हजार पुस्तके उपलब्ध आहेत. (https://eg4.nic.in/OPAC/Default.aspx?CL_NAME=DOLMH) या लिंकवर क्लिक केल्यास वाशिम जिल्हा निवड करून ग्रंथालयात असलेल्या पुस्तकाची यादी बघता येते.  जिल्ह्यामध्ये वाचन संस्कृतीस चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. वाचन संस्कृतीचा प्रसार, ज्ञानवृद्धी आणि समाजाच्या बौद्धिक विकासासाठी ग्रंथालये ही अत्यंत महत्त्वाची केंद्रे आहेत. बदलत्या काळात वाचकांच्या आवडी-निवडी, अभ्यासाच्या गरजा आणि ज्ञानाच्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल लक्षात घेऊन ग्रंथसंपदा अद्ययावत करता येते. या उद्देशाने वाचकांकडून त्यांच्या अवाडीच्या पुस्तकांना सुचविण्याचा नविन उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा ग...

नेपाळमध्ये अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील पर्यटकांनी आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

Image
नेपाळमध्ये अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील पर्यटकांनी आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन पर्यटक व नातेवाईकांनी तातडीने माहिती द्यावी वाशिम, दि. २६ ऑगस्ट  (जिमाका) : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी ...

🌿 लेकीने दिले वडिलांना जीवनदान — मायेच्या नात्याचा अद्वितीय चमत्कार!

Image
🌿 लेकीने दिले वडिलांना जीवनदान — मायेच्या नात्याचा अद्वितीय चमत्कार!  निकीता संजीवकुमार नांदगावकर काही प्रसंग असे असतात की ते केवळ एका कुटुंबाची कथा राहत नाहीत, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण बनतात. एका वडिलांवर अशीच कठीण वेळ आली होती. दुर्धर आजाराने त्यांचे लिव्हर पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर होते. डॉक्टरांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. प्रत्येक दिवस अनिश्चिततेने भरलेला होता. संपूर्ण कुटुंब चिंतेच्या गर्तेत होते. घरातील हास्य हरवले होते आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता — आता पुढे काय? अशा वेळी देवदूत बनून पुढे आली ती त्यांची लेक. ज्या बापाने तिचे बोट धरून चालायला शिकवले, जिच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, तिच्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, त्या बापासाठी लेकीने स्वतःच्या शरीरातील लिव्हरचा एक भाग दान करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता. त्यामागे वेदना होत्या, शस्त्रक्रियेची भीती होती, स्वतःच्या आरोग्याची चिंता होती; पण त्या सर्वांपेक्षा तिच्या मनात वडिलांबद्दलचे प्रेम आणि त्यांना वाचविण्याची तीव्र इच्छा मोठ...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासापहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत

Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. पहिल्यांदाच झालेल्या या कराराअंतर्गत राज्यातील १५० ग...

🌱💧 तुमची रील फक्त रील न राहता… माती आणि पाण्यासाठीचा आवाज बनू द्या!

Image
🌱💧 तुमची रील फक्त रील न राहता… माती आणि पाण्यासाठीचा आवाज बनू द्या! 🎥 ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा’ मध्ये सहभागी व्हा आणि माती व पाणी संवर्धनाचा संदेश आपल्या क्रिएटिव्ह रीलमधून द्या. 🌾 माती वाचवा 💧 पाणी जपा 🌱 सुरक्षित भविष्य घडवा !

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा. रील अपलोड कालावधी: १५ ते ३१ ऑगस्ट

Image
मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा   १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.  रील अपलोड कालावधी: १५ ते ३१ ऑगस्ट #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Image
मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay #MahaDGIPR

माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसादमान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवातउपक्रमात जवळपास ६ हजार नागरिकांची नोंदणी'माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा' चा जागर

Image
🌱💧 ‘  माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन  ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात उपक्रमात जवळपास ६ हजार नागरिकांची नोंदणी 'माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा' चा जागर  वाशिम, दि. २१ ऑगस्ट (जिमाका) माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून आयोजित **‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’**ला वाशिम शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी जवळपास ६ हजार नागरिकांनी नोंदणी केली. आमदार बाबूसिंग महाराज राठोड, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार बाबूसिंग महाराज राठोड, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक माधवराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, शिक्षणाधिकारी मंगला धुपे, जिल्हा जलसंधार...

पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!“२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!”

Image
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया! “२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!” जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका. तारीख: २१ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ६ ते ८ ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा. तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!

Image
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया! “२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!” जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका. तारीख: २१ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ६ ते ८ ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा. तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया- संजय राठोडमंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

Image
जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्...

पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!

Image
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया ! “२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!” जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका. तारीख: २१ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ६ ते ८ ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा. तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..! #SaveSoilSaveWater #maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

महावॉकेथॉन व रील्स स्पर्धेच्या माध्यमातून माती-पाण्याच्या संवर्धनाचा संदेश द्या जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन

Image
महावॉकेथॉन व रील्स स्पर्धेच्या माध्यमातून माती-पाण्याच्या संवर्धनाचा संदेश द्या   जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन  वाशिम, दि. १९ ऑगस्ट (जिमाका) : माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज असून, या विषयाबाबत युवकांच्या सर्जनशीलतेचा उपयोग करून व्यापक जनजागृती निर्माण करावी. जलसंधारण सप्ताहानिमित्त राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ रील्स स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाचा संदेश समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. स्पर्धेसाठी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करता येणार असून, माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे तसेच माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर रील तयार करता येणार आहे. कथाकथन, अभिनय, संगीत, नृत्य, अॅनिमेशन, कृत्रिम ब...

जलसंधारणाच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घ्यावा- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड· २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’

Image
जलसंधारणाच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घ्यावा - मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड · २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’ वाशिम, दि. १९ ऑगस्ट (जिमाका): मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथील वरळी प्रोमेनेड येथे तर सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय ठिकाणी होणार आहे. राज्यभर होत असलेल्या या जलसंधारण लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी निर्धार करुया आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश सर्वत्र पोहचवूया, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित होणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, लोकप्रतिनिधी, कलाकार, खेळाडू, अधिकारी-कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हे केवळ तीन किलोमीटर चालणे नसून, महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी उचललेली चार हजा...

माती वाचवा • पाणी जपा • सुरक्षित भविष्य घडवा !

Image
माती वाचवा • पाणी जपा • सुरक्षित भविष्य घडवा ! २१ ऑगस्टच्या 'जलसंधारण दिना'निमित्त महाराष्ट्र शासनाच्या जनजागृती अभियानात सामील व्हा. तुमची माती आणि पाणी संवर्धनावरील रील किंवा स्टोरी शूट करा, पोस्ट करा आणि लिंक कॉपी करून QR कोड स्कॅन करून लगेच सबमिट करा. लक्षात ठेवा, आज नाही... तर संधी संपली ! #savesoilsavewater #maharashtra #ReelChallenge2026 #mahawalkathon2026 #SecureTomorrow

विशेष लेख २१ ऑगस्ट जलसंधारण दिन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा विचार जनचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प..जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे स्मरण..शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभागाची गरज

Image
विशेष लेख  २१ ऑगस्ट जलसंधारण दिन  ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा विचार जनचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीचे स्मरण शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभागाची गरज पाणी म्हणजे जीवन. शेती, उद्योग, पर्यावरण, मानवी जीवन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्वांचा आधार पाण्यावर आहे. मात्र पावसाचे बदलते स्वरूप, वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर आणि जलस्रोतांवरील वाढता ताण यामुळे भविष्यातील पाण्याचे नियोजन हा केवळ शासनाचा विषय राहिलेला नाही. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून जलसंधारणाची व्यापक लोकचळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचाराला बळ देण्यासाठी २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात आहे. मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जात आहे. त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीचे स्मरण करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा संदेश या दिनाच्या माध्यमातून दिला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन ...

💧 ‘पाणी वाचवा, भविष्य घडवा!’ — एनसीसी कॅडेट्सचा जलसंवर्धनाचा संदेश 🌱आजचा थेंब वाचवला, तर उद्याचे भविष्य सुरक्षित!

Image
💧 ‘पाणी वाचवा, भविष्य घडवा!’ — एनसीसी कॅडेट्सचा जलसंवर्धनाचा संदेश 🌱 आजचा थेंब वाचवला, तर उद्याचे भविष्य सुरक्षित! जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर श्री. बाकलीवाल विद्यालय, वाशीम येथे एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या पुढाकाराने ‘आजचे जलसंवर्धन उपाय व पाणी बचत’ या विषयावर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पोस्टर्सच्या माध्यमातून पाणी बचत, मृदसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला. 💦🌳 ‘आजचे संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य’ ‘थेंब थेंब साठवूया, पाणीटंचाई टाळूया’ ‘माती वाचवूया, भविष्य घडवूया’ या संदेशांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेसोबतच त्यांची पर्यावरणाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी ही अधोरेखित केली. 🚶‍♂️🚶‍♀️ २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकथॉन फॉर वॉटर’! एक पाऊल मातीसाठी… एक पाऊल पाण्यासाठी… एक पाऊल सुरक्षित भविष्यासाठी! चला, आपणही सहभागी होऊया… 💧 पाणी अडवूया, पाणी जिरवूया! 🌱 माती वाचवूया, निसर्ग जपूया! 🤝 जलसंवर्धनाची ...

विशेष लेख : जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ या...

Image
विशेष लेख : जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ या... महाराष्ट्र समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध व्हावा, यासाठी जलसंधारण ही केवळ शासनाचीच जबाबदारी न राहता ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे. याच व्यापक उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त राज्यभर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो. यंदा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत जलसंधारणाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील प्रमुख उपक्रम म्हणजे २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणारी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’. हा उपक्रम या राज्यव्यापी उपक्रमातून जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पाण्याच्या संवर्धनाची जबाबदारी आणि त्यातील आपली भूमिका याविषयी जागर निर्माण करण्याचा प्...

महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार ‘ महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे— मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

Image
महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार   ‘ महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड  मुंबई, दि. १८ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या दिवशी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची संकल्पना ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टूमॉरो’ अशी असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित केली जाणार असून त्यानंतर सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे. *लोकप्रतिनिधी, विद्या...

फक्त २ दिवस बाकी! 'माती आणि पाणी' संवर्धनासाठी आजच रील करा आणि आपल्या सुरक्षित भविष्याच्या चळवळीत सहभागी व्हा..!

Image
फक्त २ दिवस बाकी!  'माती आणि पाणी' संवर्धनासाठी आजच रील करा आणि आपल्या सुरक्षित भविष्याच्या चळवळीत सहभागी व्हा..! https://register.mahaevent.co.in #SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow

वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४८ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मानले आभार

Image
वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४८ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मानले आभार वाशिम, दि. १८ ऑगस्ट (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण ४८ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या या निधीमुळे एमआयडीसीतील रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. वाशिम एमआयडीसीमधील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत एमआयडीसीच्या विकासासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाशिम एमआयडीसीतील रस्ते विकासासाठी १८ कोटी रुपये, तर पाणीपुरवठा सुविधांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे....

आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे.

Image
आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. “चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. ‘पाणी ...

जलसंधारण सप्ताह (१५ ते २१ ऑगस्ट २०२६)

Image
जलसंधारण सप्ताह (१५ ते २१ ऑगस्ट २०२६) ‘रील फॉर साॅईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत जरूर सहभागी व्हा!  #वॉकेथॉन२०२६  #वॉकफॉरवॉटर  #रिलस्पर्धा #महाराष्ट्रशासन #MahaWalkathon  #WalkForWater  #SaveSoilSaveWater #MahaDGIPR

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात

Image
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारणाच्या कामांना व्यापक लोकसहभागाची जोड देत जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती या मुलाखतीतून देण्यात येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीचे मंगळवार,१८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून २०, २१ आणि २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल ॲपवरही मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती जगदाळे यांनी केले आहे. #जलसंधारणदिन  #महावॉकेथॉन  #वॉकफॉरवॉटर #जयमहाराष्ट्र #SaveSoilSaveWater  #MahaWalkathon  #WalkFor...

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन• २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

Image
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे - मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन • २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन वाशिम, दि. १७ ऑगस्ट (जिमाका): माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमात राज्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत २१ ऑगस्ट रोजी कमाल तीन किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मंत्री संजय राठोड म्हणाले, शाश्वत विकासासाठी मृदसंध...

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृत१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा- स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन

Image
माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती १९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा - स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम, दि. १६ ऑगस्ट (जिमाका): माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते १९ ऑगस्टदरम्यान रील अपलोड करता येणार आहे मृद व जलसंधारण विभागाचे https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en , Facebook- https://www.facebook.com/mahawalkathon2026/,Twitter https://x.com/MahaWalkathon26 हे सोशल मीडिया अकाऊंट आहेत. स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करून आपल्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत‌ https...