समग्र व सर्वसमावेशक विकासाकडे वाशिम जिल्ह्याची वाटचाल : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
🇮🇳 समग्र व सर्वसमावेशक विकासाकडे वाशिम जिल्ह्याची वाटचाल : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय समारंभ उत्साहात पार पडला. राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री भरणे यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध लोकहितकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. जिल्ह्याचा विकास केवळ शेतीपुरता मर्यादित न ठेवता आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, सामाजिक न्याय आणि रोजगार या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🌾 शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
• ५४ हजार १०२ पात्र शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत समावेश
• कृषी यांत्रिकीकरणातून सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना जवळपास १८ कोटी रुपयांचे अनुदान
• ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेत २ हजार ६ शेतकऱ्यांना ६ कोटी रुपयांचे सूक्ष्म सिंचन अनुदान
• नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत १८९ गावांमध्ये कामे सुरू
• ९४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी
🏗️ विकासकामांना गती आरोग्य सुविधांसाठी सुमारे ८० कोटी रुपये, शिक्षण क्षेत्रासाठी १५ कोटी ६१ लाख रुपये, ग्रामीण वीज विकासासाठी साडेबारा कोटी रुपये आणि ग्रामीण रस्ते व जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणासाठी ४६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
🏆 महास्ट्राईड प्रकल्पात वाशिम राज्यात चौथ्या क्रमांकावर जिल्हा विकास आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणीत वाशिम जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक मिळविला असून, जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी प्राप्त झाला आहे.
🏅 यावेळी शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, आणीबाणीधारक, पोलीस अधिकारी व अंमलदार, गुणवंत विद्यार्थी, शालेय क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत मुलींचाही सन्मान करण्यात आला.
💧 जलसंधारणासाठी लोकसहभागाचे आवाहन जलसंधारण सप्ताह आणि अभियानाला जिल्ह्यात सुरुवात झाली. मृद व जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी १५ ते ३० वयोगटातील युवकांनी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कंजर्वेशन’ रील स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले.
यावेळी **‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’**च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांनी मृद व जलसंधारणाची शपथ घेत जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.
🇮🇳 एकजुटीने, लोकसहभागातून आणि विकासाच्या संकल्पातून वाशिम जिल्ह्याला सक्षम, समृद्ध आणि विकसित करण्याचा निर्धार!
#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन2026 #वाशिम #पालकमंत्री #दत्तात्रयभरणे #विकास #शेतकरी #जलसंधारण #महावॉकेथॉन2026 #WalkForWater #BetiBachaoBetiPadhao #Washim
Comments
Post a Comment