रस्त्यावर अपघात झालेला दिसला तर पुढे याल का...?तुमच्या एका धाडसी निर्णयामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो... आणि मिळू शकते ₹२५,००० चे पारितोषिक! ❤️🚑
🚨 रस्त्यावर अपघात झालेला दिसला तर पुढे याल का...?
तुमच्या एका धाडसी निर्णयामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो... आणि मिळू शकते ₹२५,००० चे पारितोषिक! ❤️🚑
रस्ता अपघातानंतरचा पहिला एक तास म्हणजेच 'गोल्डन अवर' हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचविल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
याच सामाजिक भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 'राह-वीर' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मोटार वाहन अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीला त्वरित मदत करून जवळच्या रुग्णालयात किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करणाऱ्या नागरिकाला ₹२५,००० चे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.
🌟 या योजनेची खास वैशिष्ट्ये...
✅ प्रत्येक पात्र घटनेसाठी ₹२५,००० चे रोख पारितोषिक.
✅ एका अपघातात अनेकांनी मदत केल्यास पारितोषिक नियमानुसार विभागले जाते.
✅ एका व्यक्तीस वर्षातून जास्तीत जास्त पाच वेळा लाभ.
✅ पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात PFMS द्वारे थेट रक्कम जमा.
🛡️ सर्वात महत्त्वाचे म्हणजे...
अपघातग्रस्ताला मदत केली म्हणून तुम्हाला पोलीस किंवा न्यायालयीन प्रक्रियेची भीती बाळगण्याची गरज नाही. 'गुड समारिटन' नियमांनुसार मदत करणाऱ्या नागरिकांना पूर्ण कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.
📞 अपघात दिसल्यास काय कराल?
➡️ तात्काळ १०८ रुग्णवाहिका सेवा किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधा.
➡️ शक्य असल्यास जखमी व्यक्तीला विलंब न करता जवळच्या रुग्णालयात पोहोचवा.
➡️ तुमची वेळेवर केलेली मदत एखाद्या कुटुंबाचा आधार कायम ठेवू शकते.
❤️ लक्षात ठेवा...
अपघाताकडे पाहत उभे राहणारे अनेक असतात; पण मदतीचा हात पुढे करणारेच खरे 'राह-वीर' ठरतात.
आजच हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमची एक शेअरही एखाद्याचा जीव वाचविण्याचे कारण ठरू शकते.
#राहवीर #राहवीरयोजना #GoldenHour #RoadSafety #SaveLives #GoodSamaritan #AccidentResponse #परिवहनविभाग #रस्तेसुरक्षा #जीववाचवा #सामाजिकउत्तरदायित्व #Washim #वाशिम
Comments
Post a Comment