Posts

Showing posts from June, 2023

महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण 3 व 4 जुलै रोजी जिल्हयात

Image
महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण 3 व 4 जुलै रोजी जिल्हयात         वाशिम, दि. 30 (जिमाका) : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण ह्या 3 व 4 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्यातील महिलाविषयक प्रकरणांचा आढावा आयोजित सभेत घेतील. या सभेला महिलांच्या प्रश्नांशी संबंधित असलेले विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. यामध्ये डीव्ही केसेस, तक्रार निवारण समिती, बेपत्ता असलेली बालके, बालविवाह, भरोसा सेल, निर्भया पथक, सखी वन स्टॉप सेंटर, महिलाविषयक योजनांची माहिती, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, महिला ऊसतोड कामगारांचे प्रश्न, पोलीस स्टेशन आवारातील समुपदेशन केंद्र, तृतीयपंथीयांच्या योजना, हिरकणी कक्ष, बस स्टँडवर महिला वाहकांसाठी चेंजिंग रूम, बस स्टॅन्डवरील महिलांची सुरक्षितता व शौचालय आणि महिलांचे बसमधील आरक्षण या विषयांचा समावेश आहे. 4 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन महिलांच्या पोलीस विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढाव घेतील. तसेच ॲड. श्रीमती चव्हाण ह्या महिलांच्या प्रश

कारंजा येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना लोकसहभागातून बियाणे व खत वाटप

Image
कारंजा येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना लोकसहभागातून बियाणे व खत वाटप         वाशिम, दि. 30 (जिमाका) :   कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील सदस्यांना आज 30 जून रोजी विद्याभारती महाविद्यालय, कारंजा येथे आयोजित कार्यक्रमात लोकसहभागातून बी-बियाणे व खत वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, तहलिसदार कुणाल झाल्टे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल राठोड, तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, कृषी व्यावसायीक संघटनेचे अध्यक्ष विनोद राऊत, डॉक्टरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय कांत, माजी नगराध्यक्ष संजय काकडे व श्रीकांत लव्हाळे यांची उपस्थिती होती.            मान्यवरांच्या हस्ते 107 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना बी-बियाणे व खत किटचे वाटप करण्यात आले. लोकसहभागातून बियाणे व खत वाटप करण्याकरीता डॉक्टर्स असोसिएशन, कारंजा कृषी व्यावसायकी संघटना, विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा कारंजा, मंडळ अधिकारी संघ तालुका कारंजा यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक तहसिलदार श्री. झाल्टे

खेर्डा (बु.) शिबीरात 353 लाभार्थी लाभान्वीत

Image
खेर्डा (बु.) शिबीरात 353 लाभार्थी लाभान्वीत         वाशिम, दि. 30 (जिमाका) :   शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत 28 जून रोजी कारंजा तालुक्यातील खेर्डा (बु.) येथील संत केशरमाता आश्रम सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध योजनेच्या 353 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती अशोक डोंगरदिवे व गटविकास अधिकारी शालिकराम पडघान यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसिलदार विकास शिंदे होते.             या शिबीरात संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, शिधापत्रिका, विविध दाखले व सलोखा योजनेच्या 113 लाभार्थ्यांना, दिव्यांग मदत वाटप, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सीआयएफ निधी वाटप, बचतगट कर्ज वाटप, शिलाई मशिन, शिक्षण विभागाकडून गुणगौरव प्रमाणपत्र, बालविकास सेवा योजना व इतर योजनांच्या एकूण 117 लाभार्थ्यांना, आरोग्य विभागाअंतर्गत आभा कार्ड, गोल्ड कार्ड, एनसीडी, जननी सुरक्षा योजना अशा 30 लाभार्थ्यांना व 15 व्यक्तींची आरोग्य तपासणी, कृषी विभागाकडून बियाणे परवाना, ट्रेलर सेट, कांदा चाळ व रोटावेटर

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 4333 लाभार्थ्यांना 3 कोटी 75 लक्ष व्याज परतावा रक्कम वितरीत

Image
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 4333 लाभार्थ्यांना 3 कोटी 75 लक्ष व्याज परतावा रक्कम वितरीत         वाशिम, दि. 30 (जिमाका) :   अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात 28 जून रोजी सांसदीय कार्यमंत्री तथा मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने मराठा समाजाकरीता कार्यरत असणाऱ्या व्याज परतावा योजनेची माहिती घेतली. तसेच या योजनेची कार्यपध्दी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचेकडून संगणकासमोर बसून घेतली. यावेळी श्री. पाटील यांनी राज्यातील 4 हजार 333 लाभार्थ्यांना 3 कोटी 75 लक्ष रुपये व्याज परताव्याची रक्कम स्वत: लाभार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन वितरीत केली. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री. पाटील यांनी एलओआय निर्माण करण्याची प्रक्रीया, कर्ज मंजूरीची प्रक्रीया व व्याज परतावा कशाप्रकारे करण्यात येतो याची सविस्तर माहिती समजून घेतली.             महामंडळाच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 61 ह

शासन आपल्या दारी : अमानीच्या बचतगट महिलांना 10 लक्ष रुपये कर्ज वाटप तेजश्री योजनेतून गोडंबी व्यवसायाला मिळणार गती

Image
शासन आपल्या दारी : अमानीच्या बचतगट महिलांना 10 लक्ष रुपये कर्ज वाटप तेजश्री योजनेतून गोडंबी व्यवसायाला मिळणार गती         वाशिम, दि. 30 (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव- 2 च्या वतीने अमानी येथील गाव विकास समितीच्या माध्यमातून गोडंबी व्यवसाय करणाऱ्या 66 बचतगटातील महिलांना शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत 10 लक्ष 80 हजार रुपयांचे तेजश्री फायनान्शिअल सर्विसेसच्या माध्यमातून नुकतेच कर्ज उपलब्ध करून देण्यात आले .            नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्र, मालेगाव-2 ने गोडंबी ट्रेडिंग अँड मार्केटिंगचा उप प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या उप प्रकल्पाच्या माध्यमातून अमानी येथील गोडंबी व्यवसाय करणाऱ्या महिलांना बिबे खरेदी करण्याकरीता तेजश्री फायनान्शिअल सर्विसेसच्या माध्यमातून अल्प व्याजदरातील कर्ज सहाय्य या महिलांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कर्जाचा उपयोग अमानी येथील माविम बचतगटातील महिला बीबे खरेदी करण्यासाठी करीत आहे. त्यामुळे गोडंबी व्यवसायाला चालना व गती

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन - एल्डरलाईन 14567

Image
ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी  हेल्पलाइन - एल्डरलाईन 14567         वाशिम, दि. 30 (जिमाका) :   ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध सोयीसुविधा, मार्गदर्शन, भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन-एल्डरलाईन 14567 ही सुविधा उपलब्ध असून हा हेल्पलाईन क्रमांक टोल फ्री आहे.            एल्डरलाईनकडून आरोग्यविषयी जागरूकता, उपचार, वैद्यकीय सुविधा आहाराबाबत मार्गदर्शन, निवारा केंद्र, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, विरंगुळा केंद्र, विपश्यना व ज्येष्ठांसंबंधी साधने, वैयक्तिक व कौटुंबिक याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन, विवादाचे निराकरण, आर्थिक सेवानिवृत्ती संबंधी, इच्छापत्र बनविणे तसेच शासकीय योजनांची माहिती देऊन त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते.             ज्येष्ठांना चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, जोडीदाराचा वियोग, वेळ, ताण, राग एकटेपणा दूर करून सकारात्मकता निर्माण करणे याबाबतच्या जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक आधार दिला जातो. बेघर अत्याचारग्रस्त, सोडून दिलेल्या ज्येष्ठांना मदत, दुर्लक्षित ज्येष्ठांची काळजी घेणे व त्यांना आधार देणे आणि गरजू व निराधार ज्येष

वाईगौळ आश्रमशाळा प्रकरण चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार होणार कारवाई

Image
वाईगौळ आश्रमशाळा प्रकरण चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार होणार कारवाई         वाशिम, दि. 30 (जिमाका) :   मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील तपस्वी काशिनाथ बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या व्यवस्थापन, तेथील सोयीसुविधा आणि शासन निधीचा अपहार झाल्याबाबतच्या तक्रारीची दखल घेऊन समाज कल्याण विभागाने चौकशीसाठी पाच सदस्य समिती गठित केली आहे. समितीच्या चौकशीचा स्वयं स्पष्ट अहवाल प्राप्त होताच दोषींवर नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांनी दिली. *******

दोनदच्या शेतकरी गटाला श्री.मुळे यांची भेट व संवाद

Image
दोनदच्या शेतकरी गटाला श्री.मुळे यांची भेट व संवाद वाशिम दि.29 (जिमाका) अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी आज कारंजा तालुक्यातील दोनद येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन बाळाराम शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ राहुल सातपुते, अमरावतीचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.चेडे,वाशिमचे कृषी उपसंचालक शांताराम धनुडे,वाशिमचे तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ व कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.          यावेळी दोनद येथील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.फार्मर कप स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या गटाने विविध उपक्रम राबविले.त्याची पाहणी यावेळी श्री.मुळे व अन्य कृषी अधिकाऱ्यांनी केली.

कृषी संजीवनी सप्ताह : विळेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
कृषी संजीवनी सप्ताह विळेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन वाशिम दि.29 (जिमाका) कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 1जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.सप्ताहाचे औचित्य साधून आज कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे " कृषी क्षेत्राची भावी दिशा " या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे,अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, अमरावती उपविभागीय कृषी अधिकारी पंकज चिडे,वाशिम कृषी उपसंचालक शांतीराम धनवडे व वाशिमचे तंत्र अधिकारी (विस्तार) दिलीप कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.             या कार्यक्रमात कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना जसे की, ज्यामुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यास मदत होईल याबाबत श्री.कंकाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन व कपाशी टोकन पद्धतीने वरंब्यावर लागवड करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.                 कृषी क्षेत्राची भावी दिशा याविषयावर श्री.मुळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक त

मोपच्या शिबिरातून 1820 लाभार्थ्यांना मिळाला योजनांचा लाभ

Image
मोपच्या शिबिरातून 1820  लाभार्थ्यांना मिळाला योजनांचा लाभ वाशिम दि.27 (जिमाका) रिसोड तालुक्यातील मोप येथे आज " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात मोप मंडळात येणाऱ्या गावातील विविध योजनेच्या 1820 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.             यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमित झनक,जिल्हा परिषद सदस्य अमित खडसे,पंचायत समिती सभापती श्रीमती केशर हाडे,उपसभापती सुवर्णा नरवाडे,महादेवराव ठाकरे , शिवाजीराव खानझोडे,बबनराव गारडे,डॉ सिंग,सचिन इप्पर,खुशाल लांडे,विस्तार अधिकारी श्री.खिल्लारे साहेब,श्री. कोकाटे,श्री.देशमुख यांची उपस्थिती होती.      आमदार श्री.झनक म्हणाले, 31 ऑगस्टपर्यंत या उपक्रमाची मुदत असल्याने जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.              श्रीमती तेजनकर म्हणाल्या, शासनाच्या प्रत्येक विभागाने शेवटच्या घटकापर्यंत पोहचून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा

गौण खनिज उत्खनन, वाहतूक व साठा 10 प्रकरणात कारवाई

Image
गौण खनिज उत्खनन, वाहतूक व साठा 10 प्रकरणात कारवाई         वाशिम, दि. 27 (जिमाका) :  रिसोड तालुक्यात गौण खनिजाचे उत्खनन, वाहतूक व साठा केल्यामुळे 10 प्रकरणात तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी कारवाई केली. रिसोड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक व साठा केल्याचे निदर्शनास असल्यास त्यांच्या विरुध्द दंडात्मक तसेच कायदेशीर करवाई करण्यात येईल असे यापूर्वीच कळविण्यात आले होते.तरी सुध्दा अवैध गौण खनिज उत्खनन,वाहतूक व साठा करण्याच्या प्रमाणात फरक दिसून येत नाही. अशाच एका प्रकरणात भरारी पथक 16 जून रोजी दौऱ्यावर असतांना मोजे भरजहाँगीर ते शेलू खडसे येथील पांदन रस्त्याने रेतीने भरलेले ट्रॅक्टर येत असतांना भरारी पथकाच्या दिर्शनास आला. भरारी पथकाने या ट्रॅक्टरच्या वाहन चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले असता,वाहन चालकाने ट्रॅक्टर बेदरकारपणे चालवून अवैधरित्या रेती घेऊन पसार झाला.      त्या ट्रॅक्टरबाबत सचौकशी केली असता हा ट्रॅक्टर शेलु (खडसे) येथील प्रकश पंढरी खडसे यांच्या मालकीचा असल्याचे समजले.वाहन धारकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र. एमएच-28 एजी- 3502 ने अवैध गौण खनिज चोरी केली

डव्हा तलाव मासेमारीसाठी संस्थांकडून अर्ज मागविले

Image
डव्हा तलाव मासेमारीसाठी संस्थांकडून अर्ज मागविले         वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हयातील डव्हा लघु पाटबंधारे तलाव 21 हेक्टर क्षेत्राचा आहे. हा तलाव 1 जुलै 2023 ते 30 जून 2028 या पाच वर्षाच्या कालावधीकरीता मासेमारी ठेक्याने देण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हयातील नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून तलावातील मासेमारी ठेक्याकरीता 28 जून ते 5 जुलै 2023 पर्यंत निविदा विक्रीसाठी उपलब्ध आहे. निविदा स्विकृत करण्याची, निविदा उघडण्याबाबत दिनांक व वेळ, निविदेच्या अटी व शर्तीविषयक माहिती ही कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, वाशिम यांनी कळविले आहे. *******

जिल्हा ग्रंथालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

Image
जिल्हा ग्रंथालयात कायदेविषयक शिबीर संपन्न         वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त वतीने कॉमन मिनीमम प्रोग्रामअंतर्गत 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.             जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी अन्न सुरक्षा कायदा या विषयावर, सहाय्यक लोक अभिरक्षक अतुल पंचवाटकर यांनी मुलांचे शिक्षणाचे अधिकार, लोक सहाय्यक अभिरक्षक शुभांगी खडसे यांनी मानवी तस्करी, सहाय्यक लोक अभिरक्षक हेमंत इंगोले यांनी अंमली पदार्थ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मुख्य लोक अभिरक्षक श्री. शेळके यांनी मानले. शिबीराला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्

सामाजिक न्याय दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगरुळपीर येथील मुलींच्या वसतिगृहाचे दूरदृश्यप्रणालीव्दारे लोकार्पण

Image
सामाजिक न्याय दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगरुळपीर येथील मुलींच्या वसतिगृहाचे दूरदृश्यप्रणालीव्दारे लोकार्पण                                                                                     वाशिम, दि. 26 (जिमाका) :    राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांसमोर मोठी आव्हाने असताना त्यांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. खेडोपाडी शाळा सुरू करीत वसतीगृह संकल्पना आणली. त्यामुळे वसतिगृह संकल्पनेचे जनक म्हणूनही त्यांना संबोधले जाते. तसेच त्यांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला होता. आजच्या लोकार्पण सोहळ्यातून आपण त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.             मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथून दुरदृश्यप्रणालीव्दारे मंगरुळपीर येथील नव्यानेच बांधण्यात आलेल्या 100 क्षमतेच्या मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चेंबुर येथे आयोजित कार्यक्रमातून ते बोलत होते. यावेळी त्या

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावेजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन         वाशिम, दि. 26 (जिमाका) : येत्या खरीप हंगाम 2023-24 या वर्षात शेतकऱ्यांना विविध बँकांकडून पिक कर्ज वाटप करण्यात येत आहे. सन 2023-24 या वर्षात जिल्हयातील 1 लक्ष 31 हजार 388 शेतकऱ्यांना 1 हजार 404 कोटी 84 लक्ष रुपये खरीप पिक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. आज 26 जूनपर्यंत 92 हजार 626 शेतकऱ्यांना 913 कोटी 1 लक्ष 29 हजार रुपये खरीप पिक कर्ज वाटप केले आहे. जिल्हयातील नव्याने पिक कर्ज घेण्यास पात्र असलेले आणि नुतनीकरणापासून आजही दूर असलेल्या अशा एकूण 29 हजार 362 शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पिक कर्जाचे नुतनीकरण करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.            खरीप पिक कर्ज वाटपाचे निर्धारीत उदिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पिक कर्ज वाटप करणे तसेच पिक कर्ज वाढीसह नुतनीकरण करणे आवश्यक आहे. सर्व बँका पिक कर्ज वाटपासाठी गावोगावी शिबीरे घेत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या घरी जावूनसुध्दा पिक कर्जाचे नुतनीकरण करण्याबाबत आवाहन करीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अल्प मुदतीच्या प

शासन आपल्या दारी : वाशिम तालुक्यातील 8 मंडळातील 10 हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

Image
शासन आपल्या दारी वाशिम तालुक्यातील 8 मंडळातील  10 हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप         वाशिम, दि. 26 (जिमाका) : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व लाभार्थ्यांच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी विविध योजनांचा लाभ तातडीने मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयात या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. विविध शासकीय यंत्रणा शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत हर घर दस्तक हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांच्या घरोघरी जात आहे. वाशिम तालुक्यातील 8 मंडळातील 10 हजार 722 लाभार्थ्यांना या उपक्रमांतर्गत आयोजित हर घर दस्तक कार्यक्रमातून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.             16 जून रोजी वाशिम मंडळातील 1 हजार 150 लाभार्थ्यांना, राजगांव मंडळातील 1 हजार 375, 20 जून रोजी पार्डी (आसरा) येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात 1 हजार 210 लाभार्थ्यांना, अनसिंग येथील कार्यक्रमात 1 हजार 805 लाभार्थ्यांना, 22 जून रोजी पार्डी (टकमोर) येथे आयो

शासन आपल्या दारी : हिवरा (लाहे) येथील शिबीरात 318 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

Image
शासन आपल्या दारी हिवरा (लाहे) येथील शिबीरात 318 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वाशिम, दि. 26 (जिमाका) : ‘ शासन आपल्या दारी ’ उपक्रमांतर्गत कारंजा तालुक्यातील हिवरा (लाहे) येथील रामसभा संस्थान सभागृहात आज 26 जून रोजी आयोजित शिबीरात हिवरा (लाहे) महसूल मंडळात येणाऱ्या गावातील विविध योजनांच्या 318 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.            अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार विनोद हरणे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच वर्षा लाहे, उपसरपंच विलास मनवर, मोहगव्हाणचे सरपंच भिमराव अवताडे, हिवरा (लाहे) चे पोलीस पाटील देविदास कावरे, सुधीर लाड व मंडळ कृषी अधिकारी रवी जटाळे यांची उपस्थिती होती.            यावेळी श्री. हरणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या शिबीरात महसूल विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दुय्यम शिधापत्रिका तसेच नवीन शिधापत्रिका, विविध दाखले, सलोखा योजनेच्या १५७ लाभार्थ्यांना, पंचायत विभागाअंतर्गत दिव्यांगाना मदत, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सीआयएफ निधी, बचत

परदेश शिक्षण शिष्यवृत्ती 30 जूनपर्यंत अर्ज मागविले

Image
परदेश शिक्षण शिष्यवृत्ती 30  जूनपर्यंत  अर्ज मागविले वाशिम, दि. 26 (जिमाका) :    अनुसुचित जमातीच्या 10 विदयार्थांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहे. विहित नमून्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे उपलब्ध आहे. 30 जून 2023 पर्यंत विहित नमून्यातील अर्ज परीपूर्ण भरून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाच्या सुचना फलकावर उपलब्ध आहे. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोलाचे प्रकल्प अधिकारी राजकुमार हिवाळे यांनी कळविले आहे. *******

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरा

Image
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरा वाशिम, दि. 26 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिवस 26 जून हा “सामाजिक न्याय दिन” म्हणून आज साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष वसंतराव धाडवे, श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. यु. एस. जमदाडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समता दिंडीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. समता दिंडीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पोलिस स्टेशन-बस स्टँड मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समारोप करण्यात आला.             समता दिंडी रथामधील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो व घोड्यावर स्वार झालेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज

२५ जुनपासूनकृषि संजिवनी सप्ताहाला सुरुवात

Image
२५ जुनपासून कृषि संजिवनी सप्ताहाला सुरुवात        वाशिम, दि. 26 (जिमाका) :   खरीप हंगाम २०२३ यशस्‍वी करण्‍यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक ऱ्यां पर्यंत पोहचविण्‍यासाठी २५ जुन ते १ जुलै २०२३ या कालावधीत राबविण्‍यात येणाऱ्या  “  कृषि संजिवनी सप्‍ताह  ”  अंतर्गत जिल्‍हयातील कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी ,  जिल्‍हा परिषदेचे कृषि विभाग ,  कृषि विद्यापीठ/ कृषि विज्ञान केंद्राचे शास्‍त्रज्ञ ,  कृषि मित्र ,  प्रयोगशिल तसेच प्रगतीशिल शेतकरी हे शेतकऱ्यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. २५ जुन ते १ जुलै २०२३ या कालावधीत प्रत्‍येक दिवशी कृषि क्षेत्राशी निगडीत महत्‍वाच्‍या मोहीमांवर विशेष भर देण्‍यात येवून ही मोहीम साजरी करण्‍यात येणार आहे. तारीखनिहाय विषय व साजरा करावयाचा दिवस पुढीलप्रमाणे आहे. २५ जुन- कृषि पिक तंत्रज्ञान प्रसार दिन, २६ जुन-पौष्‍टीक आहार प्रसार दिन, २७ जुन- कृषि महिला शेतकरी सन्‍मान दिन, २८ जुन- जमिन सुपिकता जागृती दिन, २९ जुन- कृषि क्षेत्राची भावी दिशा याबाबत चर्चासत्र, ३० जुन- कृषि प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन व १ जुलै २०२ 3  रोजी या सप्‍ताहाचा स्व.

सामाजिक न्याय दिनी जात वैधता प्रमाणपत्र वाटप

Image
सामाजिक न्याय दिनी जात वैधता प्रमाणपत्र वाटप        वाशिम, दि. 26 (जिमाका) :   २६ जुन हा दिवस राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने सामाजिक न्याय दिनानिमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने आज २६ जुन रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली (सुर्वे) रोड, वाशिम येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपाध्यक्षा तथा सदस्या डॉ. छाया कुलाल, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत, समाज भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नागरीक गोपाळराव आटोटे, अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एस. खंडारे, अनंतराव जूमळे, राजू झोंगळे व श्री. जमदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.           यावेळी वाशिम तालुक्यातील मानसी नर्सिंग कॉलेज, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज व राजर्षी शाहू महा

आत्माच्या वतीने तुती लागवड प्रशिक्षण

Image
आत्माच्या वतीने तुती लागवड प्रशिक्षण        वाशिम, दि. 26 (जिमाका) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने तुती लागवड पूर्व प्रशिक्षण अर्थात तुती रोप लागवडीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन वाशिम तालुक्यातील काकडदाती येथील श्रीरंग बक्षी यांच्या शेतात २४ जून रोजी करण्यात आले. तुती लागवडीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, व श्री. राऊत यांनी रेशीम विभागास मंजुरी दिली. कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव व वाशिम तालुक्यातील सन 2023-24 या वर्षात नवीन तुती लागवड करणारे शेतकरी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.           तुती लागवड तुती काड्याद्वारे केल्यास त्यामध्ये २०-२५ टक्के मर होते. त्यामुळे तुती रोपे ३ ते ३.५ महिन्याची वाढ झालेली लागवड केल्यास १०० टक्के जिवंत राहतात. त्यासाठी मनरेगाअंतर्गत ३ रुपये प्रती रोप प्रमाणे कुशलमधून ६ हजार रोपांची रक्कम १८ हजार रुपये दिली जाते. सिल्क समग्र-२ योजनेतून एकत्रित 1 एकर तुती लागवड व्यवस्थापनासाठी ४५ हजार रुपये दिले जातात. प्रती एकर ५ हजार ५०० रोप लावण्यासाठी खड्डे

पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २६: उमरी व पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मंत्रालयात आढावा घेतला. तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही. काम मार्च २०२४ पर्यंत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे शिखर समितीच्या बैठकीत सांगितले.  यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री व वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी यावेळी उपस्थित होते. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकास कामांसाठी दानपत्राद्वारे मिळणारी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, असे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्या प्रकल्पाचे काम सुरू असून मुख्य इमारतीचे काम पूण होत आले आहे. प्रकल्प दोन अंतर्गत समाधी परिसर बांधकाम, भाविकांसाठी सो

लेख : 26 जून : अमली पदार्थ विरोधी दिवस

Image
26 जून : अमली पदार्थ विरोधी दिवस  देशाचे भविष्य असलेली आजची युवा पिढी ही अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहे. हे आपण दररोज कुठल्या वृत्तपत्रातून तर कुठल्या वृत्त वाहिण्यातून वाचत ऐकत असतो. आज पालकांना आपल्या पाल्यांना अमली पदार्थाच्या सेवनापासून कसे वाचवावे,हा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात देशातील युवा पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यातून कसे मुक्त करता येईल यासाठी शासन गंभीर आहे.            देशाच्या सीमेवरून, सागरी मार्गाने व प्रसंगी हवाई मार्गाने अमली पदार्थ छुप्या पद्धतीने देशात येत असल्याचे चित्र आपण विविध ठिकाणी केलेल्या कारवाईवरून बघत असतो. सीमेवर भारतीय सैन्य,समुद्र मार्गावर तटरक्षक दल व विमानतळावर सुरक्षारक्षकांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडल्याच्या बातम्या देखील आपण वाचत असतो. अमली पदार्थावर शासनाने बंदी घातली आहे.देशाच्या सीमाच काय तर जिल्ह्यातसुद्धा अमली पदार्थाची तस्करी, सेवन व लागवड होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांना सोबत घेऊन काम करताना दिसते.               आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाणार नाही यासाठी अमली पदार्थाच्या सेवनाच्या

26 जून रोजी मंगरूळपीर येथील मुलींच्या वसतीगृहाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन

Image
26 जून रोजी मंगरूळपीर येथील मुलींच्या वसतीगृहाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन  वाशिम दि.25 (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मंगरूळपीर येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 जून रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.यावेळी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री संजय राठोड, जि. प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी,खासदार संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आमदार सर्वश्री ऍड.किरणराव सरनाईक,वसंत खंडेलवाल,धीरज लिंगाडे,विधानसभा सदस्य आमदार सर्वश्री लखन मलिक,राजेंद्र पाटणी व अमित झनक यांची तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय विशेष व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्

रोजगार मिळविण्यासाठी मानसिकता बदलविणे आवश्यक प्राचार्य प्रकाश जयस्वाल * वाशिम येथे महारोजगार मेळावा * मोठ्या संख्येने युवक व युवतींची उपस्थिती * 117 जणांची प्राथमिक निवड * विविध स्टॉलवरून रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन * 17 कंपन्यांचा सहभाग

Image
रोजगार मिळविण्यासाठी मानसिकता बदलविणे आवश्यक                  प्राचार्य प्रकाश जयस्वाल  * वाशिम येथे महारोजगार मेळावा  * मोठ्या संख्येने युवक व युवतींची उपस्थिती  * 117 जणांची प्राथमिक निवड  * विविध स्टॉलवरून रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन  * 17 कंपन्यांचा सहभाग  वाशिम दि 24 (जिमाका) रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत.पुण्या- मुंबईसारख्या शहरात तर कौशल्य आणि चांगले शिक्षण असेल तर कोणीही बेरोजगार राहत नाही.रोजगार मिळविण्यासाठी आपले घर, जिल्हा व प्रसंगी राज्याबाहेर जाण्याची तयारी असली पाहिजे. जिल्हयाबाहेर रोजगारासाठी जाणार नाही, ही मानसिकता आजच्या युवक युवतींनी बदलविणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा वाशिमच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश जयस्वाल यांनी केले.             आज 24 जून रोजी वाशिम येथील श्री.शिवाजी महाविद्यालयातील आप्पासाहेब सरनाईक सभागृहात "शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गद

महिलांच्या विकासात माविमची भूमिका महत्वपूर्ण आमदार अमित झनक रिसोड येथे माविमची 13 वी वार्षिक सभा उत्साहात

Image
महिलांच्या विकासात माविमची भूमिका महत्वपूर्ण              आमदार अमित झनक रिसोड येथे माविमची 13 वी वार्षिक सभा उत्साहात  वाशिम दि.24 (जिमाका) माविमने महिलांचे केवळ बचतगटच तयार केले नाही तर त्यांनी महिलांना उद्योग व्यवसायाची दिशा दाखविली.त्यामुळे महिलांच्या विकासात महिला आर्थिक विकास महामंडळाची भूमिका महत्वाची आहे.असे प्रतिपादन आमदार अमित झनक यांनी केले.          महिला आर्थिक विकास महामंडळाच्या रिसोड लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत कार्यरत ग्रामीण भागातील बचतगटांची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 22 जून रोजी जी.बी.लॉंन येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष नंदा गिर्रे होत्या. विशेष अतिथी म्हणून आमदार अमित झनक होते.तर जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,पंचायत समिती सदस्य गजानन आरु,बँक ऑफ महाराष्ट्र अकोला झोनचे व्यवस्थापक भगवान सुरोसे,माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख आयसीआयसीआय बँकेचे प्रदीप सांबारे व श्री.गुल्हाने, मालेगाव सीएमआरसीचे व्यवस्थापक शरद कांबळे,संतोष मुखामाले,प्रमोद गोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थ

26 जून रोजी सामाजिक न्याय दिवस

Image
26 जून रोजी सामाजिक न्याय दिवस        वाशिम, दि. 23 (जिमाका) :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याच्या व सर्व नागरीकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 26 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास अभिवादन व पुष्पहार अर्पण करुन या चौकातून समता दिंडी काढण्यात येणार आहे. ही दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे येऊन त्याठिकाणी सकाळी 11 वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त