२५ जुनपासूनकृषि संजिवनी सप्ताहाला सुरुवात
- Get link
- X
- Other Apps
२५ जुनपासून
कृषि संजिवनी सप्ताहाला सुरुवात
वाशिम, दि. 26 (जिमाका) : खरीप हंगाम २०२३ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी २५ जुन ते १ जुलै २०२३ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “ कृषि संजिवनी सप्ताह ” अंतर्गत जिल्हयातील कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कृषि विभाग, कृषि विद्यापीठ/ कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषि मित्र, प्रयोगशिल तसेच प्रगतीशिल शेतकरी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.
२५ जुन ते १ जुलै २०२३ या कालावधीत प्रत्येक दिवशी कृषि क्षेत्राशी निगडीत महत्वाच्या मोहीमांवर विशेष भर देण्यात येवून ही मोहीम साजरी करण्यात येणार आहे. तारीखनिहाय विषय व साजरा करावयाचा दिवस पुढीलप्रमाणे आहे. २५ जुन- कृषि पिक तंत्रज्ञान प्रसार दिन, २६ जुन-पौष्टीक आहार प्रसार दिन, २७ जुन- कृषि महिला शेतकरी सन्मान दिन, २८ जुन- जमिन सुपिकता जागृती दिन, २९ जुन- कृषि क्षेत्राची भावी दिशा याबाबत चर्चासत्र, ३० जुन- कृषि प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन व १ जुलै २०२3 रोजी या सप्ताहाचा स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी कृषि दिनाचे औचित्य साधुन समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
या मोहीमेत कृषि विद्यापीठाचे संशोधीत व अद्ययावत तंत्रज्ञान या मोहीमेत प्रसारीत करण्याचा मानस आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या मोहीमेदरम्यान कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहीती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जिल्हयातील प्रगतशिल शेतकऱ्यांचे विविध व्हाट्सअॅप ग्रुपद्वारे या योजनेचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. तसेच यु-टुयुब चॅनलव्दारेसुद्धा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथेच्या चित्रफीती देखील दाखविण्यात येणार आहे. या कृषी संजिवनी सप्ताहात जिल्हयातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment