12 जून रोजी विभागीय लोकशाही दिन
12 जून रोजी
विभागीय लोकशाही दिन
वाशिम, दि. 09 (जिमाका) : विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन 12 जून 2023 रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे करण्यात येणार आहे. तरी सामान्य नागरीकांनी तसेच महिलांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनामधील व महिला लोकशाही दिनामधील तक्रार अर्ज विहीत नमुन्यात लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. नागरीकांनी आपली तक्रार degamravati@gmail.com / deg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहीत नमुन्यात पाठवावे. यावे. असे आवाहन अमरावती विभागाचे उपआयुक्त संजय पवार यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment