आपदा प्रतिक्रीया बलाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान




आपदा प्रतिक्रीया बलाचा

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

        वाशिम, दि. 13 (जिमाका) : श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित सेवाध्वज कार्यक्रमामध्ये नागरी सुरक्षेसाठी नि:शुल्क कार्य करणाऱ्या आपदा प्रतिक्रीया बलाच्या (टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) अधिकारी व जवानांचा सन्मान आज १३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, टीडीआरएफचे संचालक हरिचंद्र राठोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व धर्मराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आयोजित संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनावरण, सेवाध्वजाचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भुमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देशातून लाखोंच्या संख्येने नागरीक व भाविक पोहरादेवी येथे एकत्र आले होते. या कार्यक्रमात कोणतीही जीवित हानी किंवा अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मागील १८ वर्षापासून कार्यरत टी.डी.आर.एफ. ला पाचारण करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळी टी.डी.आर.एफ. संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्त्वात टी.डी.आर.एफ. अधिकारी व जवान कार्यरत होते. टी.डी.आर.एफ. ने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वतः सुरक्षित राहून इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यरत होते.

या कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी टी.डी.आर.एफ. संचालक हरिश्चंद्र राठोड यांचे समवेत सर्व टी.डी.आर.एफ. टीमला प्रमाणपत्र देऊन सम्मानित केले. त्यामध्ये टी.डी.आर.एफ. जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस , टी.डी.आर.एफ. ड्रील इन्सट्रक्टर शुभम बैस, टी.डी.आर.एफ. मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, किरण चव्हाण, अभय संदलवार, आर्यन खीरकर, सुनील महल्ले, सागर खटाळे, पार्थ कोळपे, साहिल मुंगल, अविष्कार बागल, आस्था मोगरे, वैष्णवी अब्बलवार, सानिया आसुटकर, किशोर खटाळे, शिवम मेश्राम, नितेश वंजारी, रोहित कदम, कुणाल सातघरे, शुभम कोराम, कैलास चव्हाण, गणेश बुरांडे इत्यादी अधिकारी व जवानांचा समावेश होता.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे