शासन आपल्या दारी वाशिम तालुका : 6390 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप
शासन आपल्या दारी
वाशिम तालुका : 6390 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप
वाशिम, दि. 23 (जिमाका) : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वाशिम तालुक्यातील विविध महसूल मंडळात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात 6 हजार 390 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. वाशिम येथे 16 जुन रोजी आयोजित कार्यक्रमात 1150, राजगाव येथे 1375, पारडी (आसरा) येथे 20 जून रोजी आयोजित कार्यक्रमातून 1210, अनसिंग येथे 21 जूनच्या कार्यक्रमात 1805 आणि पार्डी (टकमोर) येथे 22 जून रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून 850 अशा पाच मंडळात घेण्यात आलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमातून 6390 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
पाच महसूल मंडळात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, सातबारा, आठ-अ, बियाणे व यंत्र वाटप, जन्ममृत्यू प्रमाणपत्र, शौचालय बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, बेबी किट व लहान मुलांना आहार वाटप करण्यात आले.
*******
Comments
Post a Comment