24 जून रोजी श्री. शिवाजी विद्यालयात महारोजगार मेळावा
- Get link
- X
- Other Apps
24 जून रोजी
श्री. शिवाजी विद्यालयात महारोजगार मेळावा
वाशिम, दि. 19 (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नोकरी इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन श्री. शिवाजी विद्यालय, मेन रोड, वाशिम येथे २४ जुन २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजतादरम्यान करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये वाशिम जिल्हयासह राज्यातील १३ पेक्षा जास्त नामांकीत उद्योगांचे उद्योजक/प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखतीद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे. ज्या रोजगार इच्छुक उमेदवाराची किमान इयत्ता १० वी, १२ वी, आय. टी. आय. (सर्व ट्रेड), पदवीधर (सर्व शाखा), पदव्युत्तर पदवी (सर्व शाखा), एम. बी. ए., एम. एस. डब्ल्यू इत्यादी शैक्षणिक पात्रता असून 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींच्या मुलाखती घेण्यात येवून विविध प्रकारच्या पदनामांकरीता ६५० पेक्षा जास्त रिक्तपदावर रोजगार मिळवण्याची संधी जिल्हयासह राज्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्राप्त होणार आहे.
तरी जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in आणि www.nic.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार सहभागी होवून २४ जुन २०२३ रोजी श्री. शिवाजी विद्यालय, मेन रोड, पाटणी चौक, वाशिम येथे प्रत्यक्षपणे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
रोजगार इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने त्यांचे २ पासपोर्ट साईजच्या फोटोसह आधार कार्ड व शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स प्रतीसह प्रत्यक्षपणे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07252-231494 आणि भ्रमणध्वनी क्रमांक 7775814153, 9764794037 व 9850983335 यावर संपर्क साधावा.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment