रोजगार मेळावा : खाजगी नियोक्ते व आस्थापनांनी15 जूनपूर्वी मागणीपत्र सादर करावे




रोजगार मेळावा : खाजगी नियोक्ते व आस्थापनांनी

15 जूनपूर्वी मागणीपत्र सादर करावे

      वाशिम, दि. 09 (जिमाका) : जिल्हयातील रोजगार इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी 24 जून रोजी वाशिम येथे रोजगार मेळावा नियोजित आहे. तरी जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील खाजगी क्षेत्रातील नियोक्ते/आस्थापना प्रमुखांनी आपल्या आस्थापनांवर आवश्यक असणारे मनुष्यबळ भरतीसाठी मागणीपत्र सादर करावे. या मागणीपत्रात पदाचे नाव व पद संख्या, शैक्षणिक/तांत्रिक पात्रता, वयोमर्यादा व मानधन इत्यादी बाबींचा अंर्तभाव करण्यात यावा. यासाठी या खाजगी आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यायचे आहे, त्यांनी कार्यालयाच्या wahimrojgar@gmail.com या ई-मेलवर 15 जूनपूर्वी मागणीपत्र सादर करावे. याबाबत काही अडचण असल्यास अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 07252-231494 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9850983335,9764794037 व 7775814153 यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.    

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे