कारंजा तालुका : 14 कोतवाल पदांसाठी 30 जूनपर्यंत अर्ज मागविले
कारंजा तालुका : 14 कोतवाल पदांसाठी 30 जूनपर्यंत अर्ज मागविले
वाशिम दि.18 (जिमाका) कारंजा तालुक्यातील 14 तलाठी साझ्यावरील कोतवालाची रिक्त पदे आरक्षणानुसार भरण्यात येणार आहे.संबंधित तलाठी साझ्याअंतर्गतच रहिवासी असलेल्या अर्जदारकडून 30 जुन 2023 पर्यंत तहसील कार्यालय,कारंजा येथे सायंकाळी 6.15 वाजतापर्यंत अर्ज मागविले आहे.
खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारास परीक्षा शुल्क 500 रुपये आणि आरक्षित जागेसाठी 250 रुपये रोख स्वरूपात तहसील कार्यालय येथे तेथे अर्ज घेतांना स्वीकारले जातील. अर्ज शुल्क 10 रुपये रोख स्वरूपात भरावे.अर्ज सादर करतांना अर्जास 29 रुपये कोर्ट स्टॅम्प चिकटविणे बंधनकारक आहे.
कारंजा तालुक्यातील रिक्त असलेल्या तलाठी साझ्यातील कोतवाल पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे.हिंगणवाडी - अनुसूचित जाती ( सर्वसाधारण), मोखड (पिंपरी) - अनुसूचित जाती (महिला),पोहा - विमुक्त जाती अ,माळेगाव - भटक्या जमाती क,( सर्वसाधारण), इंझा - भटक्या जमाती क (महिला),पसरणी - भटक्या जमाती ड,भडशिवणी - विशेष मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), काळी कारंजा - इतर मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), किन्ही रोकडे - इतर मागास प्रवर्ग (सर्वसाधारण ),दुधोरा - इतर मागास प्रवर्ग (महिला ), कामरगाव - आर्थिकदृष्ट्या मागास (ई.डब्ल्यू.एस) सर्वसाधारण, सोमठाणा - आर्थिकदृष्ट्या मागास (ई.डब्ल्यू.एस) महिला,उंबर्डाबाजार - खुला (सर्वसाधारण) आणि विळेगाव - खुला (सर्वसाधारण) असे 14 कोतवाल पदाचे आरक्षण निश्चित केले आहे.तरी अर्जदारांनी विहित कालावधीत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावे.तहसीलदार कारंजा यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment