महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची शहीद अमोल गोरेंच्या परिवाराला मदत


महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची 
शहीद अमोल गोरेंच्या परिवाराला मदत  

वाशिम दि.12 (जिमाका) शहीद जवान अमोल गोरे यांच्या परिवाराकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन मदत म्हणून गोळा केलेली 50 हजार रुपये रोख रक्कम आज 12 जून रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांच्या हस्ते शहीद अमोल गोरे यांचे वडील तान्हाजी गोरे व आई मंदाबाई गोरे यांना देण्यात आली. 
      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,अधीक्षक राहुल वानखडे, सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,नायब तहसीलदार कैलास देवळे,सुनील घोरे, कर्मचारी संघटना अध्यक्ष तात्यासाहेब नवघरे,कार्याध्यक्ष माधवराव शिंदे, अतुल देशमुख,धर्मराज चव्हाण तसेच अन्य महसूल विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित