योजनांच्या लाभासाठी 29 जूनपर्यंत अर्ज मागविले
योजनांच्या लाभासाठी
29 जूनपर्यंत अर्ज मागविले
वाशिम, दि. 22 (जिमाका) : विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी 29 जून 2023 पर्यंत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरीकांनी ऑनलाईन अर्ज करावे. या कालावधीत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येईल. 29 जूननंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत संबंधित नागरीकांनी नोंद घ्यावी. असे तहसिलदार, वाशिम यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment