रिसोड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न


रिसोड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न

वाशिम दि.21(जिमाका) तहसील कार्यालय रिसोड येथे आज राष्ट्रीय आपत्ती मोचन दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनावर एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणेचे निरीक्षक आर.जे.यादव,पोलीस निरीक्षक श्री गीते,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,मंडळ अधिकारी दिनकर केंद्रे,विभिषण मोरे,छत्रपती बहुउद्देशीय तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष गजानन मेसरे यांची उपस्थिती होती.
          यावेळी उपस्थितांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.भगत,तहसीलदार श्रीमती तेजनकर यांनी मार्गदर्शन केले.
        निरीक्षक आर.जे.यादव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,पूर, भूकंप,हृदय विकाराचा धक्का,रस्ते अपघात,सर्पदंश,त्सुनामी,आग,वीज, एखादा व्यक्ती पुरात,तलावात, विहिरीमध्ये पडला तर त्याला बाहेर कसे काढले पाहिजे आणि त्याला प्रथमोपचार कशापद्धतीने दिला पाहिजे.याबाबत चमूने शोध व बचाव साहित्याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.तसेच साहित्याची माहिती दिली.पूर,भूकंप,आग,सर्पदंश,हार्ट अटॅक,रस्ते अपघात याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले व मार्गदर्शन केले.
         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रिसोड यांच्या वतीने आयोजित केलेल्या या एकदिवसीय  प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तहसील कार्यालय वाशिम,रिसोड व मालेगाव येथील विविध विभागाचे  अधिकारी,कर्मचारी,नदीकाठच्या गावाचे सरपंच,मंडळ अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक,स्वयंसेवी संस्था छत्रपती तरुण मित्र मंडळाचे स्वयंसेवक,पट्टीचे पोहणारे व्यक्ती यांची उपस्थिती होती. 
      कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री बांडे यांनी केले.यशस्वीतेसाठी तहसील कार्यालय रिसोड येथील मंडळ अधिकारी दिनकर केंद्रे,प्रताप साबळे,श्री पडघान तसेच वाशिम तहसील कार्यालय येथील सीता राऊत,तहसील कार्यालय मालेगाव येथील श्रीमती गोरे,रिसोड तहसील कार्यालय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे