गौण खनिज उत्खनन, वाहतूक व साठा 10 प्रकरणात कारवाई


गौण खनिज उत्खनन, वाहतूक व साठा
10 प्रकरणात कारवाई
        वाशिम, दि. 27 (जिमाका) :  रिसोड तालुक्यात गौण खनिजाचे उत्खनन, वाहतूक व साठा केल्यामुळे 10 प्रकरणात तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी कारवाई केली. रिसोड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक व साठा केल्याचे निदर्शनास असल्यास त्यांच्या विरुध्द दंडात्मक तसेच कायदेशीर करवाई करण्यात येईल असे यापूर्वीच कळविण्यात आले होते.तरी सुध्दा अवैध गौण खनिज उत्खनन,वाहतूक व साठा करण्याच्या प्रमाणात फरक दिसून येत नाही. अशाच एका प्रकरणात भरारी पथक 16 जून रोजी दौऱ्यावर असतांना मोजे भरजहाँगीर ते शेलू खडसे येथील पांदन रस्त्याने रेतीने भरलेले ट्रॅक्टर येत असतांना भरारी पथकाच्या दिर्शनास आला. भरारी पथकाने या ट्रॅक्टरच्या वाहन चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले असता,वाहन चालकाने ट्रॅक्टर बेदरकारपणे चालवून अवैधरित्या रेती घेऊन पसार झाला. 

    त्या ट्रॅक्टरबाबत सचौकशी केली असता हा ट्रॅक्टर शेलु (खडसे) येथील प्रकश पंढरी खडसे यांच्या मालकीचा असल्याचे समजले.वाहन धारकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र. एमएच-28 एजी- 3502 ने अवैध गौण खनिज चोरी केली असल्याने त्याच्याविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 379 नुसार पोलीस स्टेशन रिसोड येथे 26 जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आल.
            तरी नागरीकांनी तहसिल कार्यालय,रिसोड येथे रितसर अर्ज करुन गौण खनिज वाहतूक परवाना प्राप्त करुन घेऊनच गौण खनिजाची वाहतुक करावी.अवैध गौण खनिजाचे उत्खनन,वाहतूक व साठा केल्याचे आढळल्यास संबंधिताविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे रिसोडच्या तहलिसदार प्रतिक्षा तेजनकर यांनी कळविले आहे. 
                   *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे